हा आठवडा तुमच्यासाठी अंतर्ज्ञान, रचनात्मकता आणि मानसिक संतुलन मजबूत करणारा राहील. तुम्ही तुमचे विचार व भावना उत्तमप्रकारे समजू शकाल. ज्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल व एखाद्या जुन्या प्रयत्नाचा सकारात्मक परिणाम मिळू शकेल.
■ नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात नोकरदारांना स्वत:ची प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामातील तुमच्या भूमिकेची प्रशंसा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल. व्यापाऱ्यांसाठी या आठवड्यात योजना व्यवस्थितपणे लागू करण्याची संधी मिळेल.
■ नाती-गोती या आठवड्यात जीवनसाथीसोबत भावनिक जवळीक वाढेल. प्रेमसंबंधात संवेदनशीलता व जाण नाते अधिक मजबूत करील. अविवाहितांसाठी एखाद्या नव्या व्यक्तीशी सार्थक परिचय होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांती व आत्मीयता देईल.
■ आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील पण अनियमित झोप व मानसिक थकवा वा भावनिक चढ-उतार राहू शकतो. डोळे वा पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. झोपेअभावी तुमची ऊर्जा प्रभावित होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस आराम करावा. पाणी जास्त प्यावे.
■ शुभदिनांक : २८,०१, ०४
शुभरंग लाल, नारंगी, सोनेरी
■ शुभवार रविवार, मंगळवार, गुरुवार
■ दक्षता भावनेच्या आधारे आर्थिक वा व्यावसायिक निर्णय घेणे टाळावे.
■ उपाय : गुरुवारी श्रीविष्णूला पिवळे फूल अर्पण करावे आणि ॐ नमो वासुदेवाय मंत्राचा १०८ जप करावा.