वरिष्ठ सनदी अधिकारी विक्रम कुमार यांनी महापारेषणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा (सीएमडी) कार्यभार स्वीकारला.महाराष्ट्र कॅडरच्या 2004 बॅचचे अधिकारी असलेले विक्रम कुमार यांना नागरी प्रशासन, पायाभूत सुविधा विकास, औद्याेगिक प्रगती आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील दाेन दशकांहून अधिकचा अनुभव आहे. महापारेषणमध्ये रुजू हाेण्यापूर्वी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) अतिर्नित महानगर आयु्नत-1 म्हणून कार्यरत हाेते.बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेले विक्रम कुमार यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पुण्याचे आयु्नत, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयु्नत, महाराष्ट्र मेरिटाइम बाेर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. विक्रम कुमार यांच्यासमाेर आता ऊर्जा संक्रमण, राज्यातील पारेषण जाळ्याचा विस्तार, अक्षय ऊर्जा प्रकल्पांचे प्रभावी एकत्रीकरण, ग्रीडचे आधुनिकीकरण आणि राज्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे बळकटीकरण ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.