शरीरामध्ये ओमेगा-थ्रीची कमतरता कशी दिसून येते?

    28-Jun-2026
Total Views |
 
 

Health 
चेहऱ्याला चमकविण्यासाठी स्किन-केअर प्राॅडक्टस्चा वापर करणे ही चांगली गाेष्ट आहे. पण, फक्त स्किन-केअर प्राॅडक्ट्स यूज केल्याने चेहऱ्यावर चमक येईल असे नाही.यासाठी तुम्हाला हेल्दी-डाएटवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. जर तुमच्या आहाराने शरीराला चांगले पाेषण मिळत नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. चेहरा शुष्क आणि निस्तेज दिसू लागेल.
त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठीचे असेच एक न्यूट्रिअन्ट म्हणजे ओमेगा-थ्री-फॅटी अ‍ॅसिड! शरीरामध्ये ओमेगा-थ्रीची कमतरता असेल, तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसण्यास सुरू हाेते. चेहरा काेरडा हाेऊन जाताे, लालसरपणा-खाज येते, सुरकुत्या दिसतात, त्वचा ओघळते.
 
काय लाभ हाेताे? ओमेगा-थ्री त्वचेच्या नॅचरल माॅइश्चरला कायम ठेवण्याचे काम करते. याचा परिणाम, स्किन हायड्रेटेड राहते. धूळ, प्रदूषणापासून त्वचेला रक्षण देण्यासाठी हेल्दी स्किन बॅरियर फार आवश्यक आहे. यात असलेले अ‍ॅन्टी-इन्फफ्लेमेंटरी गुण मुरमे, इसब, साेरायसिस यांसारख्या त्वचेसंबंधित समस्यांमध्ये आराम देण्याचे काम करतात. ओमेगा-थ्री अल्ट्राव्हायाेलेट किरणांविरुद्ध त्वचेला रक्षण देण्याचे काम करते, परिणाम म्हणून उन्हामुळे हाेणारे सनबर्न आणि स्किन रेडनेसच्या समस्येचा धाेका घटताे. हे काॅलेजन नावाच्या प्राेटीनचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. ओमेगा-थ्री त्वचेवरील डाग दूर करण्याचे आणि चेहऱ्याचा रंग उजळण्याचे काम करते.कशापासून मिळते? ओमेगा-थ्रीला हेल्दी फॅट्स म्हटले जाते. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश करून ओमेगा-थ्री मिळवू शकता.
 
तसे पाहिल्यास, काजू, बदाम, पिस्ता या सगळ्यांत हेल्दी फॅट्स असतात, पण सगळ्यांत जास्त ओमेगा-थ्री फॅटी अ‍ॅसिड्स अखराेडमध्ये असते. तसेच फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स हे दाेन्हीही ओमेगा-थ्रीचा चांगले साेर्स आहेत.ओमेगा-थ्री अल्ट्राव्हायाेलेट किरणांविरुद्ध त्वचेला रक्षण देण्याचे काम करते, परिणाम म्हणून उन्हामुळे हाेणारे सनबर्न आणि स्किन रेडनेसच्या समस्येचा धाेका घटताे. हे काॅलेजन नावाच्या प्राेटीनचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. ओमेगा-थ्री त्वचेवरील डाग दूर करण्याचे आणि चेहऱ्याचा रंग उजळण्याचे काम करते.
 
कशापासून मिळते? : ओमेगाथ्रीला हेल्दी फॅट्स म्हटले जाते. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश करून ओमेगा-थ्री मिळवू शकता. तसे पाहिल्यास, काजू, बदाम, पिस्ता या सगळ्यांत हेल्दी फॅट्स असतात, पण सगळ्यांत जास्त ओमेगा-थ्री फॅटी अ‍ॅसिड्स अखराेडमध्ये असते. तसेच फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स हे दाेन्हीही ओमेगा-थ्रीचा चांगले साेर्स आहेत.