देशात बालसंगाेपनाच्या पद्धती बदलत आहेत

    28-Jun-2026
Total Views |
 
 

child

 
भारतात बालसंगाेपनाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. YouGov-Mint CPR मिलेनियल सर्वे क्षणानुसार, आजच्या पालकांना आपल्या मुलांना पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढवायचे आहे.सर्वेक्षणात पाचपैकी केवळ एका व्यक्तीने सांगितले, की त्यांना आपल्या मुलांना त्यांच्या पालकांनी वाढविल्याप्रमाणेच वाढवायचे आहे. पूर्वी 54 टक्के पालक केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करत हाेते; हे प्रमाण आता 43 ट्न्नयांपर्यंत खाली आले आहे.पारंपरिक आणि धार्मिक मूल्यांवर दिला जाणारा भरही कमी झाला आहे. पूर्वी या शिक्षणावर 57 टक्के भर दिला जायचा. आता ताे सुमारे 49 ट्न्नयांपर्यंत खाली आला आहे. श्रीमंत कुटुंबे अजूनही पारंपरिक पालकत्व पद्धतींना प्राधान्य देतात. मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांसाठी सुरक्षित आणि स्थिर नाेकऱ्यांना प्राधान्य देतात.
 
दरम्यान, दक्षिण भारतात पालकत्वाविषयीची वृत्ती सर्वांत उदार आणि मु्नत आहे. तेथील केवळ 39 टक्के लाेक अभ्यासाला सर्वांत महत्त्वाचे मानतात. तर इतर प्रदेशांमध्ये हा आकडा 43-47 ट्न्नयांच्या दरम्यान आहे. शहरांमध्ये राहणारे पालक आता त्यांच्या मुलांच्या माेबाईल फाेन आणि साेशल मीडियाच्या अतिवापराबद्दल सर्वाधिक चिंतित आहेत.आजकाल, मुलांच्या डिजिटल व्यसनामुळे बहुतेक पालकांची झाेप उडते. सर्वेक्षणात, 65 टक्के पालकांनी ही त्यांची सर्वांत माेठी चिंता असल्याचे सांगितले.पाहणीत 57 टक्के पालकांनी साेशल मीडियावरील अयाेग्य मजकूर हा काळजीचा विषय असल्याचे सांगितले. तर, 51 ट्न्नयांनीशारीरिक सुरक्षा व प्रदूषण याला आपली सर्वांत माेठी चिंता असल्याचे सांगितले.आजकाल पालक मुलांवर केवळ अभ्यासाचे ओझे लादण्याऐवजी त्यांना खेळ, कला आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी हाेण्यासाठी प्राेत्साहित करीत आहेत. मुलांना त्यांचे करिअर निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य देण्याचीही त्यांची इच्छा आहे.