विक्रम भटची आपली उदबत्ती!

    28-Jun-2026
Total Views |
 

bhat 
 
आपली उदबत्ती लावणं म्हणजे जिथे आपला काही संबंध नाही तिथे उगाच चमकाेगिरी करण्याचा प्रयत्न करणं.इथे विक्रम भट तेच करताेय. विषय आहे ऑब्सेशन्स या हाॅलिवूडच्या सिनेमाचा. हा एक छाेट्या बजेटचा, अनाेळखी कलावंतांचा हाॅररपट. एरवी त्याचं नावही कुणाला माहिती असलं नसतं, पण ताे जगभरात सरप्राइझ हिट झाला आणि जिथे तिथे त्याचीच चर्चा सुरू आहे. काहीजणांनी हा सिनेमा डाेक्यावर घेतलेला आहे आणि काही लाेकांना मात्र या सिनेमात सगळा बी ग्रेड मामला आहे, त्यात इतकं आवडण्यासारखं काय आहे, असा प्रश्न पडला आहे. विक्रम भट हा महेश भटच्या विशेष फिल्म्स नावाच्या फॅक्टरीतून एकेकाळी चीप, स्लीझी, सवंग हाॅररपट देणारा दिग्दर्शक. त्याने गुलामसारखा सणसणीत सिनेमा दिलेला आहेच कधीकाळी, पण नंतर ताे राझ, राझ 2, हाँटेड, 1920, क्रीचर, घाेस्ट, शापित अशा नावांच्या सवंग भयपटांमध्येच गुरफटलेला दिसताे. त्याने हा सिनेमा पाहताना आपण हसत हाेताे आणि आपल्याला राझ हा आपलाच सिनेमा पाहात असल्यासारखं वाटत हाेतं, अशी टिप्पणी केली आहे. त्यावर एकाने खवचट टिप्पणी केली आहे की इंटरस्टेलर सिनेमात मॅथ्यू मॅकनाेहेचं रडणं पाहून मला सलमान खानचं राधेमाेहनच्या भूमिकेतलं रडणं आठवलं म्हणजे इंटरस्टेलर हा ‘तेरे नाम’च आहे.