संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकमधून साेमवारी प्रस्थान हाेणार

    27-Jun-2026
Total Views |
 

tryambak 
 
संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी साेहळ्यास साेमवारी (29 जून) दुपारी दाेन वाजता देवस्थान परिसरातून सुरुवात हाेणार आहे.त्र्यंबकेश्वर परिसरात खाेदलेल्या रस्त्यांमुळे यंदा पालखी साेहळ्याचा नियाेजित मार्ग बदलण्याची वेळ देवस्थानावर आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे. यंदा साेमवारी दुपारी या साेहळ्यास सुरुवात हाेणार आहे. पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात पालखीचा मु्नकाम असेल. त्यानंतर एक जुलैस सातपूर, दाेन जुलैस पंचवटीत मु्नकामी असेल. त्यानंतर अहिल्यानगर, मिरजगाव, कर्जत, काेरेगाव, रागाव, जेऊर, कंदर, दगडी अकाेले, करकंबमार्गे हा पालखी साेहळा 25 जुलैस पंढरपूरला मु्नकामी जाईल. या पालखी साेहळ्यात नाशिकसह अन्य भागांतून हजाराेंहून अधिक वारकरी सहभागी हाेणार आहेत. वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययाेजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंके यांनी दिली.यंदाची वारी पर्यावरणपूरक व्हावी यासाठी ज्या ठिकाणी पालखीचा मु्नकाम असेल तेथे हे सीडबाॅल टाकण्यात येतील. तसेच वारीत फिरते शाैचालय राहील. वारकऱ्यांनाही पर्यावरणपूरक वारीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्याचे साळुंके यांनी सांगितले.