समृद्धी महामार्गाचा जळगावपर्यंत विस्तार हाेणार

    27-Jun-2026
Total Views |
 

samruddhi 
 
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार आता खानदेशातील जळगावपर्यंत करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा 105 किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असून, या महामार्गाला ‘खानदेश महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गाच्या प्राथमिक आराखड्याचे काम सध्या एमएसआरडीसीकडून सुरू आहे. लवकरच यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प मार्गीलावला जाणार आहे. प्रकल्प मार्गी लागल्यास जळगाव ते छत्रपती संभाजीनगर अंतर तीन तासांऐवजी केवळ एका तासात पार करता येणार आहे.मुंबई आणि नागपूर प्रवास अतिजलद करता यावा, यासाठी एमएसआरडीसीने 701 किमीचा समृद्धी महामार्ग बांधला आहे.
 
हा महामार्ग 10 जिल्ह्यांना थेट जाेडताे. हा महामार्ग राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांशी जाेडला जावा यासाठी एमएसआरडीसीकडून या महामार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. त्यानुसार जालनानांदेड, नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गाेंदिया, भंडारागडचिराेली असा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील सर्वांत माेठे बंदर पालघरमधील वाढवण येथे बांधले जात आहे. या बंदरालाही समृद्धी महामार्गाशी जाेडण्यासाठी वाढवण ते तवा आणि तवा ते भरवीर असा द्रुतगती महामार्ग बांधला जात आहे.समृद्धी महामार्गाला आता खानदेशाशीही जाेडण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानुसार अंदाजे 105 किमीचा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा सहापदरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर असल्याचेही सांगण्यात आले.