ओशाे - गीता-दर्शन

    27-Jun-2026
Total Views |
 

Osho 
मी हवा आत घेताे, विशिष्ट प्रमाणात, अन् ती राेखून धरताे तशीच.मग माझ्या छातीवर हत्ती आला तरी त्याचा भार माझ्यावर पडत नाही. ताे भार त्या भरलेल्या हवेवर पडताे.’ पण मग ज्याच्यामुळेछाती हत्तीचे वजन सहन करते, त्या अभ्यासाची एक प्रक्रिया असली पाहिजे.आपल्या शरीराच्या अनेक क्षमता असतात. इत्नया, की आपण गणती नाही करू शकणार. त्या सगळ्या क्षमता तशाच न वापरता पडून राहतात. कारण दैनंदिन जीवनाला त्याची काहीच गरज पडत नसते. जीवनासाठी जेवढी गरज आहे तेवढे शरीर काम करते. वैज्ञानिकांना विचारले तर ते म्हणतात, ‘आपल्या शरीरश्नितचा उपयाेग आपण दहा ट्न्नयांपेक्षा जास्त करून घेत नसताे.आपली नव्वद ट्नके श्नती तशाच पडून जाते अन् इकडे आपण खलासही हाेऊन जाताे.
 
ती न वापरताच जन्मताे, जगताे अन् मरताे.शरीर जे करू शकत हाेते त्यातले नव्वद ट्नके तसेच राहून जाते.याेगाचे पहिले काम हे आहे की, ही जी नव्वद ट्नके ऊर्जा सुप्त पडली आहे, ती जागवते. त्यामुळे अंतर्यात्रा हाेऊ शकेल. कारण ऊर्जेशिवाय कुठलीही यात्रा हाेऊ शकत नाही. तुम्हाला जर असे वाटत असेल की, एक दिवस असा उजाडेल की आपण जहाज बिनाऊर्जे चं चालवू शकू, तर ताे भ्रम आहे. तसे कधीही हाेऊ शकणार नाही.आपण सूक्ष्मतम ऊर्जेचं रूप शाेधून काढू हे श्नय आहे. बैलगाडी चालते ती ऊर्जेवर, माणूस पायी चालताे ते ऊर्जेवर, श्वास चालताे ताे ऊर्जेवर, सर्व हालचाल, गतिमानता ऊर्जेवर आधारित असते. परमात्म्यापर्यंत तरी जायला आपल्याला ऊर्जेची काही गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.