नवी मुंबईत एमएसएमई परिषद

    27-Jun-2026
Total Views |
 
 
NV
राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्याेग क्षेत्राला नवी दिशा देणारी महाराष्ट्र एमएसएमई परिषद व एमएसएमई पुरस्कार-2026 साेहळा शनिवारी (27 जून) वाशीच्या सिडकाे प्रदर्शन केंद्रात हाेणार आहे. महाराष्ट्र लघुउद्याेग विकास महामंडळाने (एमएसएसआयडीसी) आयाेजिलेल्या या परिषदेत राज्यासह देश- विदेशातील उद्याेग क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर मंथन करणार आहेत.जागतिक एमएसएमई दिनाचे औचित्य साधून आयाेजिण्यात आलेल्या या परिषदेसाठी संकल्पातून सिद्धीकडे ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
 
एक ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्याेग क्षेत्राची भूमिका अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यभरातील 2500 हून अधिक उद्याेजक, धाेरणकर्ते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, उद्याेगतज्ज्ञ; तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी हाेणार आहेत. उद्याेग क्षेत्रातील आव्हाने, संधी आणि भविष्यातील दिशा यावर यात सखाेल चर्चा हाेणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर उद्याेजकांना मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेदरम्यान निर्यातवाढ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्याेगांचे डिजिटल रूपांतर, शाश्वत औद्याेगिक विकास, वित्तपुरवठा, महिला उद्याेजकतेला प्राेत्साहन यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष चर्चासत्रांचे आयाेजन करण्यात आले आहे.