मुंबईसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर करणार

    27-Jun-2026
Total Views |
 

mumbai 
 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत अवघा आठ ट्नके पाणीसाठा उरल्याने महापालिकेने अपर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठ्यातून 1468 एमएलडी पाणी वापरण्याचे नियाेजन केले आहे. भातसा धरणातूनही अतिर्नित राखीव पाणीसाठा वापरण्यास मंजुरी मिळाली. मात्र, त्यात अद्याप 57 लाख 288 एमएलडी पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे हा साठा संपल्यानंतरच राखीव पाणीसाठ्याचा वापर करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.एल निनाेच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने धरणांतील पाणीसाठ्यात घट हाेत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 1 लाख 25 हजार 585 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईत 15 मेपासून 10 ट्नके पाणीकपात लागू करण्यात आली हाेती. दरम्यान, राज्य सरकारने मुंबईकरांसाठी अपर वैतरणा आणि भातसा धरणांतील राखीव पाणीसाठा वापरण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे.
 
अपर वैतरणा धरणातून 93500 दशलक्ष लिटर, तर भातसातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी सरकारकडे केली हाेती. राखीव साठ्यामुळे मुंबईकरांना पुढील दाेन महिने पाणी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध हाेईल.जलसंपदाच्या निर्देशानुसार महापालिकेने पिण्याच्या पाण्याचे नियाेजन करत काटकसरीच्या उपाययाेजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती लक्षात घेता औद्याेगिक व व्यावसायिक पाणीवापरात कपात लागू केली आहे. तसेच सर्व बांधकामांसाठीचा पाणीपुरवठा तसेच सर्व जलतरण तलावांचा पाणीपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.