मध्य प्रदेशातील श्याेपूर जिल्ह्यातील खेडा गावात राहणाऱ्या 60 वर्षीय घनश्याम मीना यांनी राजस्थानच्या बारा जिल्ह्यात राहणाऱ्या गाैरबाई यांच्याशी विवाह केला आहे.गाैरबाई दर्शनासाठी राजस्थानमधील रामगड माता मंदिरात गेल्या हाेत्या, तिथे त्यांची भेट गाैरबाईंशी झाली. घनश्यामभाईंची पत्नी आणि गाैराबाईंचे पती काही वर्षांपूर्वी वारले हाेते, त्यामुळे ते दाेघे एकटे पडले हाेते. मुले आणि सासरच्या मंडळींकडून हाेणाऱ्या सततच्या छळाला सामाेरे जाणाऱ्या या दाेघांच्या आयुष्यातही त्यांच्या स्वतः च्या दुःखद कहाण्या हाेत्या, ज्यांच्याबद्दल बाेलताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले.प्रेमात पडल्यानंतर, समाज आणि इतर लाेक काय म्हणतील याची चिंता न करता दाेघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वृद्ध वयात झालेल्या प्रेमविवाहाचे हे एक अनाेखे उदाहरण असू शकते.