माहीम किल्ल्याचे हाेणार पुनरुज्जीवन

    27-Jun-2026
Total Views |
 
 

mahim 
राज्य संरक्षित स्मारक म्हणून घाेषित असलेल्या माहीम किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई महापालिका आणि सीमाशुल्क विभागादरम्यान महापालिका मुख्यालयात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.ऐतिहासिक पुरातन वारसा असलेला माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी या कामाला गती मिळाली आहे.
आता हा किल्ला पर्यटन स्थळाच्या रूपात विकसित करण्यात येणार असून, मुंबईकरांना विरंगुळ्याचे ठिकाणही मिळणार आहे. महापालिकेचे उत्तर विभाग कार्यालय, सीमाशुल्क विभाग, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार मे. विकास दिलावरी आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे (व्हीजेटीआय) संरचनात्मक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डाॅ. के. के.सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहीम किल्ल्याची पुनर्स्थापना व संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या हा किल्ल्याभाेवती गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणे वाढली हाेती.
 
सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या या किल्ल्यावरील अतिक्रमण महापालिकेने हटवल्यानंतर आता या किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.या करारावेळी महापालिका आयु्नत अश्विनीभिडे, अतिर्नित आयु्नत डाॅ. अश्विनी जाेशी, सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयु्नत अजयकुमार पांडे, सीमाशुल्कचे अतिर्नित आयु्नत नितीन तगाडे, विक्रम फडके, उपायु्नत प्रशांत सपकाळे, सहायक आयु्नत याेगेश देसाई, विकास दिलावरी, डाॅ. सांगळे उपस्थित हाेते. माहीम किल्ल्यास त्याचे वैभव आणि साैंदर्य प्राप्त करून देण्यात येईल, असे आयु्नत भिडे यांनी सांगितले. माहीम किल्ल्याचे सक्षमीकरण व पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. किल्ला परिसरातील ऐतिहासिक विहिरीचा शाेध व उत्खनन केले जाणार आहे. किल्ल्याच्या आतील परिघाभाेवती पादचारी मार्ग विकसित करण्यात येईल तसेच किल्ल्याच्या पायाभरणीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक तटबंदी बांधण्यात येईल. यासाठी 20 काेटींची तरतूद करण्यात आली आहे.