आजकालच्या धावपळीच्या जीवनात महिलांमध्ये थायराॅइड एक सामान्य आजार झाला आहे.थायराॅइडच्या दर 100 केसेसपैकी 80 महिलांच्या असतात. आपल्या गळ्याच्या भागात एक ग्रंथी असते.जिला थायराॅइड म्हणतात. यातून एक हार्माेन स्रवते. या हार्माेनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित हाेत असतात.जेव्हा आपल्याला वाटते की, आपल्याला थाेडेसे काम केल्यानंतरही जास्त थकवा जाणवू लागला आहे, आपले वजन वाढू लागले आहे, शरीराच्या अवयवांमध्ये हलके हलके दुखत आहे. स्किन आणि केसांमध्ये रुक्षपणा दिसू लागला आहे वा आपण लहान सहान गाेष्टींमुळे तणावाने व निराशेने घेरले जात आहात तेव्हा समजावे की, आपण हायपाेथाॅयराइडचे शिकार आहात.
अशावेळी कॅफिन व शुगरचे प्रमाण अत्यंत कमी करावे.याशिवाय जे शरीरासाठी शुगरप्रमाणे काम करतात असे खाद्यपदार्थही कमी करावेत. खाण्यात प्राेटीनचे प्रमाण वाढवावे. शरीरात प्राेटीनच थायराॅइड हार्माेन वाहून टिश्यूजपर्यंत पाेहाेचवते. प्राेटीनचे प्रमाण वाढवून थाॅयराइडची कार्यप्रणाली सामान्य करता येऊ शकते. या आजारात वजन वाढणे माेठी समस्या आहे.वजन कमी करण्याच्या नादात नेहमी रुग्ण फॅट साेडून देतात. यामुळे शरीरात हार्माेनचे संतुलन बिघडते.अशावेळी शरीराच्या गरजेनुसार फॅट अवश्य घ्या. या आजारात विशेषकरून महिलांमध्ये आयर्न कमी हाेते. अशावेळी त्यांना आयर्नसाेबत इतर पाैष्टिक पदार्थही भरपूर प्रमाणात घ्यायला हवेत. सुदृढ राहण्यासाठी समताेल आहार घ्यावा.