‘नागपूर व परिसरात मेंटेनन्स कमांड, ऑटाे एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात माेठी गुंतवणूक हाेत आहे. या उद्याेगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममाेहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या विशेष उपस्थितीत विमानतळ हस्तांतर साेहळ्यात मुख्यमंत्री बाेलत हाेते. या विमानतळाचे आधुनिकीकरण, विस्तार आणि विकासाच्या दृष्टीने जीएमआर कंपनीकडे विमानतळ हस्तांतरित करण्यात आले आहे.नागपूरसह मध्य भारतातील प्रवाशांना उत्तम हवाई वाहतुकीसाेबतच कार्गाे हबच्या माध्यमातून निर्यातीला माेठ्या प्रमाणात प्राेत्साहन मिळणार आहे.
नागपूर हे लाॅजिस्टिक कॅपिटल हब म्हणूनही ओळखले जात असल्यामुळे विमानतळाचा विकास; तसेच दुसऱ्या धावपट्टीची आवश्यकता या हस्तांतरामुळे पूर्ण हाेणार आहे. नागपूरच्या सभाेवताली व्याघ्र प्रकल्प असून, देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देतात. या पर्यटनाला विमानतळामुळे चालना मिळणार आहे. नागपूर सभाेवताली माेठ्या प्रमाणात खनिज संपदा उपलब्ध आहे. त्यामुळे येथील खनिज आधारित उद्याेगाला गती मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नागपूर विमानतळाचे केवळ हस्तांतरच हाेणार नसून, हा क्षण विदर्भाच्या विकासाचा टेक ऑफ असल्याचे नायडू यांनी सांगितले.हा हस्तांतरण साेहळा आधुनिक पद्धतीने पार पडला.विमानतळाच्या प्रवेशद्वावर राेबाेटच्या साह्याने फित कापून मान्यवरांनी मुख्य इमारतीत प्रवेश केला. येथील झिराे माइल तसेच संपूर्ण जगात संत्र्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्र्याचा वापर बाेधचिन्हात समर्पकपणे करण्यात आला आहे. बाेधचिन्हाचे सादरीकरण आधुनिक पद्धतीने करण्यात आले.