6. शूरता - कुत्रा हा लढवय्या असताे. त्याच्यावर आक्रमण हाेण्याची शंका जरी आली तरी ताे समाेरच्यावर न घाबरता आक्रमण करताे, तुटून पडताे.कुत्रा पाळल्याने कित्येक चाेऱ्या, घराेड्या टळतात. कुत्रा मालकासाठी पुढे हाेऊन झुंजताना प्राणासही मुकताे, हे आपण पुष्कळदा पाहताे.
बाेध : एखाद्या सामान्य प्राण्याकडूनही शिकण्यासारख्या बऱ्याच गाेष्टी असतात. त्या जरूर आत्मसात कराव्यात.‘‘अबे साले कुत्ते!’’ असे अपशब्द वापरणाऱ्यांनी तर यावर जरूर विचार करावा.