चंद्रपूर विमानतळासाठी धावपट्टीचा आराखडा प्रस्ताव आल्यास मान्यता : आशिष शेलार

    27-Jun-2026
Total Views |
 
 

Airport 
चंद्रपूरच्या माेरवा विमानतळाच्या विकासासाठी 950 मीटर धावपट्टीऐवजी 1800 मीटर धावपट्टी उभारण्याचा व्यवहार्य आराखडा आणि आवश्यक तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यास राज्य शासन त्याला मान्यता देईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी केंद्राच्या ‘उडान’ याेजनेंतर्गत अमरावती, गाेंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, साेलापूर, काेल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे विमानतळ व धावपट्टी विकासाची कामे सुरू असल्याची माहिती शेलार यांनी दिली. माेरवा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारात काही अडचणी आहेत.तथापि, या विमानतळामुळे ताडाेबा पर्यटनाला माेठी चालना मिळू शकते. देश- विदेशातील पर्यटक, संशाेधक आणि अभ्यासक येथे भेट देतील. तसेच राेजगार निर्मितीलाही गती मिळेल. अधिवेशन संपल्यानंतर संबंधित अधिकारी, एमएडीसी, जिल्हाधिकारी, अर्थ विभाग आणि लाेकप्रतिनिधींची संयु्नत बैठक घेऊन पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.