1832 मध्ये जन्मलेले जाेनाथन नावाचे गॅलापागाेस कासव सध्या जगातील सर्वात जुने कासव मानले जाते. या 194 वर्षीय जाेनाथनने नुकताच आणखी एक इतिहास रचला आहे.17 जून राेजी, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सने जाेनाथनला जगातील सर्वात वृद्ध भूचर प्राणी म्हणून सन्मानित केले गेले. जगातील सर्वात असामान्य विक्रम धारकांना दिला जाणारा सन्मान, ‘गिनीज आयकाॅन’ म्हणून त्याला अधिकृतपणे घाेषित करण्यात आले.