गेल्या काही दिवसांपासून दुलाल गिरी महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका साधूची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ साेशल मीडियावर फिरत आहेत. असा दावा केला जात आहे की, हे महाराज शिवांची अत्यंत कठीण साधना करत आहेत. यासाठी त्यांनी न बसण्याचा निश्चय केला आहे.सामान्यतः तपश्चर्या आणि ध्यान बसून केले जाते, परंतु या महाराजांनी उभे राहून साधना करण्याचा सराव केला आहे.व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, हे महाराज किमान पाच वर्षांपासून उभे राहत आहेत. ते उभे राहूनच विश्रांतीही घेतात. यासाठी ते आपल्या शरीराचा पुढचा भाग टेबलावर झुकवून विश्रांती घेताना दिसतात. सतत उभे राहिल्यामुळे त्यांचे गुडघे सुजले आहेत आणि पायांमधील रक्तसंचार थांबल्याने त्यांचे पाय खालून काळे पडत आहेत.काही लाेकांचा असा दावा आहे की, दुलालगिरी महाराज ही तपश्चर्या पाच वर्षांपासून नव्हे, तर 12 वर्षांपासून करत आहेत. तथापि, या दाव्यांची कुठेही पडताळणी झालेली नाही.