माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, अर्थतज्ज्ञ तथा राजर्षी शाहू महाराजांचे अभ्यासक डाॅ. जे. के. पवार यांची मुलाखत प्रसारित हाेणार आहे.दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवारी (26), शनिवारी (27) आणि साेमवारी (29 जून) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या माेबाईल अॅपवर प्रसारित हाेणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काेल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, सहकार, उद्याेग, ग्रामविकास, कला, संस्कृती, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या याेगदानाचा या मुलाखतीत सविस्तर ऊहापाेह करण्यात आला आहे.