ओशाे - गीता-दर्शन

    26-Jun-2026
Total Views |
 
 
Osho
 
त्याच्याच सतत अभ्यासाने परमात्म्यात प्रतिष्ठा उपलब्ध हाेते. मी म्हणताे पुन्हा प्रतिष्ठा मिळते. याेग काय आहे? याेगशास्त्र काय करते? याेगाची केमिस्ट्री, किमया काय आहे? याेगाचे सार काय? सूत्र काय? रहस्य काय? गुरूकिल्ली काेणती? तीन कारणे लक्षात घ्या. एक, मानवी शरीरात एक जेवढी ऊर्जा वापरताे त्याच्या अनंतपट श्नती निर्माण करण्याची साेय आणि व्यवस्था आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जमिनीवर झाेपवले, तर तुमच्या छातीवरून कार नाही जाऊ शकणार.तुम्ही खलास व्हाल, पण राममूर्तीच्या छातीवरून कार नेता येते. पण गंमत अशी की, राममूर्तीची छाती आणि तुमची छाती यामध्ये काेणताही माैलिक फरक नाहीये. त्याच्या छातीच्या बरगड्यात थाेड्याशासुद्धा प्रमाणात एखादं तत्व कमी जास्त प्रमाणात हजर नाहीये. तुमच्या छातीच्या बरगड्यांच्या तुलनेने!
 
ज्या मूलतत्वांनी तुमचे शरीर बनले त्याच मूलतत्वांनी राममूर्तींचेही बनलेले आहे. मग राममूर्ती काय करत आहे? राममूर्ती ज्या श्नतीचा उपयाेग करताे तेवढ्या श्नतीचा उपयाेग तुम्ही कधी करीत नाहीत. तुम्ही तुमच्या छातीचा उपयाेग फ्नत एवढा करता-श्वास घ्यायचा अन् साेडायचा.फ्नत एक छाेटेसे काम. मग छातीपण त्या कामापुरतीच तयार हाेते. राममूर्ती एक माेठे काम याच छातीकडून करवून घेताे.गाड्याच्या गाड्या ताे छातीवरून नेववताे, छातीवर हत्ती उभे करताे. जेव्हा कुणी त्याला विचारले. ‘याचे रहस्य काय?’ तेव्हा त्याने सांगितले, ‘रहस्य वगैरे काही एक नाही. कारच्या ट्यूब टायरचे जे रहस्य असते, तेच हे.’ रबर ते काय! पण त्याच्या ट्यूबमध्ये हवा भरली एका विशिष्ट प्रमाणात, तर ती माेठाचा माेठा ट्रक सहज वाहून नेते. राममूर्तीने म्हटले, ‘मी फुफ्फुसं अन् बरगड्या यांजकडून तेच काम करून घेताे, जे तुम्ही रबरी ट्यूब टायरकडून करून घेता.