काेयनेत 8 % उपयु्नत साठा

    26-Jun-2026
Total Views |
 

Koyna 
 
मान्सूनचे आगमन लांबल्याने काेयना धरणाची जलपातळी कमालीची खालावली आहे. धरणात सध्या केवळ 8.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कृष्णा-काेयना नद्यांकाठी पाणीबाणी आणि राज्यासाठी वीज निर्मितीची चिंता वाढली आहे.सध्या काेयना धरणात एकूण 13.87 टीएमसी (13.18 टक्के) जलसाठा असून, त्यापैकी उपयुक्त जलसाठा अवघा 8.75 टीएमसी (8.31 टक्के) उरला आहे. पायथा वीजगृहातून सध्या 525 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता परिस्थिती गंभीर आहे. गेल्या वर्षी आजमितीस धरणात 35.65 टीएमसी (33.87 टक्के) एकूण, तर 30.40 टीएमसी (28.88 टक्के) उपयुक्त जलसाठा हाेता. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय हाेण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी अद्याप पावसाची ठाेस चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीचे माेठे संकट उभे राहिले असून, बळीराजासह सर्वांचेच डाेळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत.