व्यग्र जीवनशैलीच्या तणावातून छाेटे छंद आराम देतील

    26-Jun-2026
Total Views |
 


hobby
 
सध्या अनेकांचे जीवन यंत्रवत झाले आहे. सतत कुठेतरी पाेहाेचण्याची घाई, काम पूर्ण करण्याचा दबाव यामुळे अनेकांना मानसिक विश्रांती मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात अनेकजण ‘मायक्राे हाॅबीज’ आत्मसात करत आहेत.‘मायक्राे हाॅबीज’बद्दल मानसशास्त्रज्ञ मिती मेहता यांनी सांगितले, या अशा लहान, साेप्या कृती असतात, ज्यामध्ये माेठी झंझट नसते.राेज फक्त 5 ते 20 मिनिटांमध्ये मनाच्या आनंदासाठी, आरामासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी कधीही करू शकता. कामाच्या मधे मिळणाऱ्या वेळेतही ती सहज करता येते. पारंपारिक पद्धतीच्या छंदामध्ये खूप वेळ द्यावा लागताे.काही छंदांसाठी पूर्व नियाेजन लागते तर काहींसाठी महागडी साधने खरेदी करावी लागतात. मायक्राे हाॅबीत आर्थिक खर्च, पूर्व नियाेजनाची डाेकेदुखी नसते.
 
आजूबाजूला जे उपलब्ध आहे, त्यातूनच हे छंद लगेच सुरू करता येतात. सामान्य छंदामध्ये व्यक्तीचे लक्ष काहीतरी शिकण्यावर, त्यात सर्वाेत्तम बनण्यावर किंवा निपुणता मिळवण्यावर जास्त असते, ज्यामुळे कधी कधी मानसिक दबाव निर्माण हाेताे.मायक्राे हाॅबीमध्ये काेणतीही स्पर्धा किंवा परफेक्ट बनण्याची शर्यत नसते. यामध्ये काेणाला काही सिद्ध करायचे नसते, ही कृती केवळ स्वतःच्या आनंदासाठी करायची असते. माेठे छंद सुरू करण्यासाठी अनेकदा मूड बनवावा लागताे. आळसामुळे बऱ्याचदा त्याची सुरुवातच हाेत नाही. मायक्राे हाॅबीज मधील कृती खूप लहान, साेप्या असल्याने त्या कधीही, काेणत्याही आळसाशिवाय लगेच सुरू करता येतात.सामान्यतः बहुतांश छंदामध्ये ध्येय गाठण्यावर जास्त भर असताे.त्यामुळे निकाल मिळत नाही ताेपर्यंत समाधान लाभत नाही.