निराेगीपणासाठी नीटनेटका आहार आणि पुरेशी झाेप घेणे आवश्यक

    26-Jun-2026
Total Views |
 

Health 
1. ताटात दिसावेत रंग : अमेरिकन इंस्टीट्यूट फाॅर कॅन्सर रिसर्चच्या एका शाेधात सांगितले गेले आहे की, पाैष्टिक आणि संतुलित आहार आणि एक सुदृढ जीवनशैली कॅन्सरची पुनरावृत्ती राेखण्यात कशी मदत करू शकते. यासाेबतच आणखीही अनेक समस्या राेखण्यासही याची मदत हाेते.खाण्या-पिण्यात कडधान्ये, भाज्या, ताजी फळे व बीन्स इ. सामील कराा. कारण यामध्ये अनेक सकस घटक असतात जे कॅन्सर राेखण्यास मदत करीत असतात. निरनिराळ्या रंगांचा नैसर्गिक आहार पाेषणाच्या सर्व घटकांचे स्थान आपल्या ताटात सुनिश्चित करताे. असे पदार्थ आपल्या खाण्यात सामील करा जाे फायबर, व्हिटॅमिन, खनिज आणि फायटाेन्यूट्रिएंट्ससारख्या घटकांनी समृद्ध असतील. आहारात सामील हे पाैष्टिक घटक वजनही नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मदत करतील.
 
2. रिफाइंड आहार टाळा : फास्ट फूड आणि इतर प्राेसेस्ड खाद्य पदार्थ खाणे कमी करा. यात सामान्यत: जास्त कॅलरी असतात.
यातील बरेचसे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते. रेड व प्राेसेस्ड मीट खाणे कमी करा. हे कॅन्सरचा धाेका वाढवत असल्यामुळे यांपासून दूर राहावयाचे आहे.
 
3. गाेड पेये मर्यादित : साखर आणि गाेड पेये मर्यादित करा. साखरेपासून बनवलेली गाेड पेये आराेग्यकारक नसतात आणि सामान्यत: विना जादा पाेषणाशिवाय अनावश्यक कॅलरी देत असतात. अल्काेहल वर्ज्य करावे.