कनेक्टिव्हिटीमुळे गाेपनीयतेला धाेका निर्माण हाेताेय

    26-Jun-2026
Total Views |
 



cyber
 
 
 
कनेक्टिव्हिटीमुळे गाेपनीयता धाे्नयात आपले जीवन पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आणि कनेक्टेड झाले आहे. मनाेरंजन, सुविधा आणि साेशल मीडियाच्या या युगात, हीच कनेक्टिव्हिटी आता आपल्या गाेपनीयतेसाठी सर्वात माेठा धाेका बनत आहे.ओटीटी प्लॅटफाॅर्म, स्मार्ट टीव्ही, स्मार्टफाेन, स्मार्ट कार आणि अगदी साेशल मीडियावर पाेस्ट केलेले सेल्फीसुद्धा आता डेटा चाेरी आणि पाळत ठेवण्याचे साधन बनत आहेत. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, सामान्य लाेकांचे दैनंदिन जीवनसुद्धा डिजिटल पाळतीच्या कक्षेत आले आहे.ग्राहक वाचत नाहीत गाेपनीयता धाेरण कंपन्या अनेकदा जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे संमती मिळवतात, कारण बहुतेक वापरकर्ते गाेपनीयता धाेरण न वाचताच आपली संमती देतात.डिजिटल पाळत ठेवणारी उपकरणे उपकरणे किंवा सेवा विकणाऱ्या कंपन्या दैनंदिन जीवनावर नजर ठेवत आहेत.
 
स्मार्टफाेन: अनेक एप्स बॅकग्राउंडमध्ये तुमची संभाषणे ऐकतात आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या जाहिराती दाखवतात. जीपीएस आणि सेन्सर्सच्या मदतीने, तुमच्या प्रत्येक हालचालीचा मागाेवा घेतला जाताे.
 
स्मार्ट टीव्ही: अनेक स्मार्ट टीव्ही स्वयंचलित कंटेंट ओळखण्याच्या माध्यमातून तुम्ही काय पाहत आहात याचा मागाेवा घेतात. टीव्हीमध्ये बसवलेले मायक्राेफाेन तुमची खासगी संभाषणे रेकाॅर्ड करू शकतात.अलेक्सा आणि गुगल हाेमसारखे स्मार्ट स्पीकर्स त्यांना सक्रिय करण्यासाठी ‘वेक वर्ड’ (आदेश ची वाट पाहत सतत ऐकत असतात. ही संभाषणे रेकाॅर्ड करून कंपन्यांना पाठवली जाऊ शकतात.वाय-फाय राउटर्स सायन्स डायरेक्ट मासिकात प्रकाशित झालेल्या नवीन संशाेधनानुसार, वाय-फाय राउटर्स बीम-फाॅर्मिंग फीडबॅक द्वारे खाेलीतील लाेकांच्या हालचाली 99% अचूकतेने ओळखू शकतात.
 
कनेक्टेड कार: कारच्या सीट्स, डॅशबाेर्ड, इंजिन आणि स्टिअरिंग व्हील्सवर बसवलेल्या सेन्सर्सद्वारे तुमचा डेटा रेकाॅर्ड करतात. माेझिला फाउंडेशनच्या ‘प्रायव्हसी नाइटमेअर ऑन व्हील्स’अहवालानुसार, अनेक कार्स संवेदनशील डेटा गाेळा करत आहेत.
25 कार्सच्या सर्वेक्षणात, 19 कार्सनी सांगितले, की त्या हा डेटा विकू शकतात.ओटीटी प्लॅटफाॅर्म विराेधात खटला अमेरिकेतील टे्नसासच्या अटाॅर्नी जनरल केने पै्नसटन यांनी नेटफ्ल्निसवर खटला दाखल केला. या खटल्यात आराेप आहे की, या, स्ट्रीमिंग प्लॅटफाॅर्मने ग्राहकाच्या अगदी मुलांच्याही हालचालींवर पाळत ठेवली आणि त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय त्यांची माहिती गाेळा केली.