चीनमधील शू नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीला एक जंगली मशरूम खाल्ल्यानंतर अचानक आपण सुपरमॅन झालाे आहाेत असे वाटू लागले आणि त्याने असे काही केले ज्यामुळे त्याचा जीव धाेक्यात आला. आपण अमर झालाे आहाेत असे समजून त्याने 27 व्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली आणि एका पाइपच्या साहाय्याने खाली जाऊ लागला.गाेष्ट अशी हाेती की, शूने घरी जंगली मशरूम वाढवले हाेते. हे मशरूम खाल्ल्यानंतर त्याला भास हाेऊ लागले. ते खाल्ल्यानंतर त्याला वाटले की त्याचे कुटुंब त्याला अमर बनण्याचे प्रशिक्षण देत आहे आणि आता त्याचा मृत्यू कायमचाटळला आहे. अमरत्वाच्या त्या जगात त्याने खिडकीतून उडी मारली.
तथापि, पाइपवर खाली येताच त्याला वास्तवाची जाणीव झाली. त्याला वाटले की ताे आता खाली पडेल.असे असूनही, ताे पाइपमधून खाली जात राहिला. मात्र, 26 व्या मजल्यावर राहणाऱ्या त्याच्या मित्राने शू ला पाइपला लटकलेले पाहिले आणि लगेच त्याचा हात पकडून त्याला पूर्ण ताकदीने घरात खेचले. या घटनेनंतर खूप घाबरलेला शू बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ डाॅक्टरांकडे नेण्यात आले, जिथे तपासणीदरम्यान डाॅक्टरांनी सांगितले की त्याच्या शरीरात जंगली बुरशीमधील एक रसायन आढळले आहे, जे अल्काेहाेलसाेबत सेवन केल्यास मेंदूत भ्रम निर्माण करते.