गुंतवणुकीची माेठी संधी असल्याने अमेझाॅन कंपनीने राज्यात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री

    26-Jun-2026
Total Views |
 

Amazon 
‘डेटा सेंटर्स’ क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही, तर राज्यात आराेग्य, तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काैशल्य विकास यामध्ये माेठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे अमेझाॅनने राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमेझाॅनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधीवर चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्र, गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, विकास आयुक्त (उद्याेग) कादंबरी बलकवडे, अमेझाॅन एडब्ल्यूएसचे कंट्री हेड संदीप दत्ता, अमेझाॅन ग्लाेबलचे कंट्री हेड समीर कुमार, एडब्ल्यूएसचे पब्लिक पाॅलिसी संचालक विक्रम श्रीधरन, ग्लाेबल अमेझाॅनचे उपाध्यक्ष धर्मेश मेहता उपस्थित हाेते. नवी मुंबईत मेडिसिटी उभारण्यात येत आहे. तेथे संपूर्ण उपचार पद्धतीची साखळीच निर्माण करण्यात येणार आहे. अशा मेडिसिटीच्या माध्यमातून अमेझाॅनला आराेग्य क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची संधी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.