एकल महिलांच्या सक्षमीकरणासासाठी सरकार व्यापक धाेरण राबवणार : अदिती तटकरे

    26-Jun-2026
Total Views |
 
 

Aditi 
राज्यातील अंदाजे 50 ते 55 लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक धाेरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या हितसंवर्धनाला सर्वाेच्च प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले. महिला व बाल विकास विभाग, मुंबई शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एकल महिला दिन’, तसेच प्रस्तावित ‘एकल महिला धाेरण’ यानिमित्त आयाेजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत तटकरे बाेलत हाेत्या. या वेळी तटकरे यांच्या हस्ते, तसेच जिल्हाधिकारी आंचल गाेयल यांच्या उपस्थितीत महिला व बाल विकास विभागाच्या विविध याेजनांची माहिती देणाऱ्या क्यूआर काेडचे अनावरण करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शाेभा शेलार यांनी एकल महिला धाेरणाचे महत्त्व, कार्यशाळेची उद्दिष्टे आणि धाेरण निर्मितीची प्रक्रिया याविषयी माहिती दिली. कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लाभार्थी महिला व अधिकारी उपस्थित हाेते. बालविवाह प्रतिबंधासाठी आदिशक्ती समित्या विशेष माेहीम राबवत असून, राेखण्यात आलेल्या बालविवाहांची, तसेच नाेंदवण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे विभागाकडून पुढील धाेरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे तटकरे यांनी सांगितले.