उत्तम झाेपा आणि अवाजवी वजन वाढणे राेखा

    26-Jun-2026
Total Views |
 
 

sleep 
 
इंग्लंडमध्ये दर तीनपैकी दाेन पुरुष आणि दहापैकी सहा महिला एक तर स्थूलतेने ग्रस्त असतात वा जास्त वजनी असतात असा अंदाज लावला गेला आहे. चांगली गाेष्ट ही आहे की शिकागाे विद्यापीठाच्या मेडिसिनच्या वैज्ञानिकांद्वारे केलेल्या एका नव्या अध्ययनात आढळून आले आहे की, रात्रीची एक उत्तम झाेप दिवसातील 500 कॅलरीपर्यंतची भूक कमी करते. तसेच याद्वारे अनेक लाेक आपले वजनही कमी करू शकतात. वैज्ञानिकांच्या मते, पुरेशी झाेप घेतल्यास लाखाे लाेक वजन वाढणे राेखू शकतात.तरुणांवर करण्यात आले संशाेधन संशाेधकांनी 80 पेक्षा जास्त वजन असलेल्या तरुणांना अ‍ॅडमिट केले जे सामान्यत: रात्री फक्त साडेसहा तास झाेपत असत. त्यांना झाेपताना स्लीप माॅनिटर घालण्यास सांगितले आणि राेज रात्री साडेआठ तास झाेपण्यास सांगण्यात आले. या तरुणांना आपल्या आहारात काेणताही बदल करावा लागला नाही.उत्तम झाेप बनवते उत्तम डाॅ. एसरा तसली सांगते, ‘झाेपेवर बंधने घालण्याचा परिणाम भुकेवर हाेत असताे.ज्यामुळे जेवणाचे सेवन वाढते आणि अशा प्रकारे आपल्याला वजन वाढण्याचा धाेका असताे. जर झाेप कमी घेतल्यास असे हाेत असेल तर आपण उत्तम झाेप घेऊन यात उत्तम बदल करू शकताे.