लिली काेरेल यांची आई म्हणजे त्यांना जणू एक काेडेच हाेती. अनेक वेळा त्या दाेघी एकत्र हसून-खेळून राहायच्या, पण कधी कधी आई अचानकपणे भयानक हिंसक व्हायची. लिलीला आठवते की, एकदा आईने तिला भिंतीवर ढकलले हाेते आणि जिवे मारण्याची धमकी दिली हाेती.आश्चर्याची गाेष्ट म्हणजे, या हिंसक वृत्तीनंतरही लिली वारंवार तिच्या आईकडे आकर्षित हाेत असे. याला ‘ट्राॅमा बाॅन्डिंग’ असे म्हणतात.पीडित व्यक्ती आशेला चिकटून राहते मेंटल हेल्थ अमेरिकेचे डाॅ. पियरलुइगी मॅनसिनी यांनी याविषयी सांगितले, की शाेषणानंतर, प्रेम किंवा दयाळूपणाने वागल्यास हे नातेसंबंध अधिक घट्ट हाेते. याला थांबून-थांबून दिलेले प्राेत्साहन (इंटरमिटेंट रीइन्फाेर्समेंट) असे म्हणतात.
हे इतके प्रभावी असते की, पीडित व्यक्ती सर्व दुःख विसरून जाते आणि या आशेला चिकटून राहते, की जाेडीदार वाईट नाही, फक्त कधीकधी त्याचा राग अनावर हाेताे.हिंसक वृत्तीनंतरही नात्याचे आकर्षण समान दुःख भाेगलेल्या दाेन मैत्रिणींमधील मैत्रीचे वर्णन करण्यासाठी लाेक ‘ट्राॅमा बाॅन्डिंग’ हा शब्द वापरतात, पण वास्तवता यापेक्षा खूप वेगळी आहे. ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे पीडित व्यक्ती हा आपला छळ करणाऱ्या व्यक्तीशी खूप जाेडली जाते.शाेषणाचे समर्थन करू नका ट्राॅमा ए्नसपर्ट जनिना फिशर यांनी सांगितले, की जर तुम्ही शाेषणाचे समर्थन केले, तर ही सर्वात माेठी चूक आहे.
त्यामुळे तुम्ही सामाजिकदृष्ट्या दूर हाेता. तुम्ही स्वतःला मित्र आणि कुटुंबापासून ताेडून टाकता. किंवा जर तुम्हाला असे वाटत असेल की, ती व्यक्ती तुम्हाला दुखावत असली तरी तुम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे.माफी मागितल्याने मिळताे आनंद डाॅ. मॅनसिनी यांच्या मते, जेव्हा गुन्हेगार माफी मागताे किंवा प्रेम दाखवताे, तेव्हा पीडित व्यक्तीच्या मेंदूत डाेपामाइन आणि ऑक्सिटाेसिनसारखे न्यूराेट्रान्समीटर स्रवतात. ज्यामुळे आनंद आणि जवळीकीची भावना निर्माण हाेते. हा क्षण पीडित व्यक्तीला स्तब्ध करताे, ज्यामुळे ती व्यक्ती ते नाते साेडू शकत नाही.स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या! जर तुम्ही अशा नात्यात अडकला असाल, जे साेडणे कठीण आहे, तर ताे तुमचा दाेष नाही. हा तुमच्या मनाचा आणि छळ करणाऱ्या व्यक्तीचा एक गुंतागुंतीचा मानसिक खेळ आहे. याेग्य मदत आणि पाठिंब्याने हे बंधन ताेडले जाऊ शकते.