कारागृह पुनर्विकास, आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना गती द्यावी : डाॅ. पंकज भाेयर

    24-Jun-2026
Total Views |
 
 

project 
 
राज्यातील कारागृहांचा पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर यांनी दिल्या.
कारागृहांबाबतच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्दे शांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात राज्यमंत्री भाेयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नागपूर, वर्धा आणि मुंबई मध्यवर्ती कारागृहांच्या स्थलांतर व पुनर्विकास प्रकल्पांचा सविस्तआढावा घेण्यात आला. या बैठकीस एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, कारागृहे व सुधारसेवाचे महासंचालक सुहास वारके, गृह विभागाचे (तुरुंग) सहसचिव सुग्रीव धपाटे; तसेच संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांच्या कामकाजाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले.राज्यातील कारागृह व्यवस्थेचे आधुनिकीकरण, बंदी क्षमता वाढवणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे डाॅ. भाेयर यांनी नमूद केले.