आराेग्यावर दूषित वातावरणाचाही परिणाम हाेत असताे. सध्याचं वातावरण किती दूषित झाले आहे हे तर सर्वच जाणतात. वारंवार खाज सुटणे, त्वचा साेलवटून निघून डाग पडणे, केस गळणे, नखांची वाढ न हाेणे असे अनेक विकार नदी-नाल्यातील दूषित पाण्यामुळे हाेऊ शकतात. रस्त्यांवर पेट्राेल- डिझेलच्या वाढलेल्या धुराचे प्रमाणही मुलांच्या आराेग्यावर परिणाम करीत आहेत.दूषित पाण्यामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धातू, आर्से निकसारखे घातक पदार्थ, तसेच पेट्राेलियममधील काही घातक रसायने इत्यादींचा समावेश असताे. त्यामुळे वरील दाेष निर्माण हाेऊ शकतात.हे पाणी पाेटात गेल्यास वारंवार उलट्या, जुलाब हाेणे, भूक मंदावणे, शरीराची वाढ खुंटणे अशी काही लक्षणे दिसू लागतात. श्वासावाटे शरीरात गेले, तर फुफ्फुसाचे कायमस्वरूपी आजार हाेऊ शकतात.
सूर्याच्या प्रखर किरणांपासूओझाेन वायूचे कवच आपले संरक्षण करीत असते, पण दूषित वातावरणाचा या कवचावरही परिणाम हाेऊ लागल्याचे जाणवू लागले आहे.सूर्यकिरणांमुळे त्वचा जळणे, ए्निझमा यांचे प्रमाण केवळ मुलांमध्येच नव्हेतर माेठ्यांमध्येही नक्कीच दिसू लागले आहे.अणुशक्तीवर चालणारी केंद्रे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीही वरीलप्रमाणे आजार वाढत आहेत की, काय अशी शंका येऊ लागली आहे. तसेच, पीक चांगले येण्यासाठी खतांचा वापर माेठ्या प्रमाणात हाेताे आणि जंतुनाशकांची फवारणीही केली जाते. त्यामुळे भाज्या, फळे नीट धुतली नाहीत, तर ही रसायनेही थाेड्या प्रमाणात का हाेईना पाेटात जातात. त्यामुळेही पाेट दुखणे, जुलाब-उलट्या हाेणे, भूक मंदावणे असे पाेटाचे विकार हाेत आहेत.
दूषित वातावरणामुळे हाेणाऱ्या प्रत्येक परिणामावर औषध निश्चितआहे, पण मुळातच असे वातावरण निर्माण हाेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी लाेकजागृती व्हायला हवी. आपल्याभाेवती काय चालले आहे व त्याचे परिणाम काय हाेऊ शकतात याकडे जागरूक राहून पाहायला हवे व वेगळे काही आढळल्यास ते थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा.प्रदूषणामुळे हाेणारे हे सर्व आजार एक-दाेन दिवसांत हाेत नाहीत व त्यांची लक्षणे दिसण्यास काही वर्षेही लागू शकतात.त्यामुळे दहा-बारा वर्षांनंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आजच काही गाेष्टी टाळायला हव्यात. प्रदूषण वाढवण्यात प्रत्येकाचाच थाेड्या-फार प्रमाणात वाटा असताे. अशा वेळी आत्मचिंतनाची गरज असते. सुधारणा घरातूनच करावी, असा दृष्टिकाेन प्रत्येकाने बाळगला, तर ही समस्या नाहीशी हाेऊ शकेल.