ज्याप्रमाणे बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्यांना फेंगशुईने मदत मिळते तशीच फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठीही फेंगशुई उपयुक्त आहे.फेंगशुईचा प्रयाेग करून काेणीही फ्लॅट वा अपार्टमेंटमध्ये निसर्गाशी सामंजस्य करून सुखाने राहू शकताे.जेव्हा आपण राहण्यासाठी एखाद्या अपार्टमेेंटची निवड कराल तेव्हा प्रथम अपार्टमेंट काेणत्या जागी आहे ते पाहा.त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र कशाप्रकारचे आहे तेही पाहा. आपल्या भारतीय वास्तुशास्त्रापेक्षा फेंगशुई वास्तुशास्त्रात खूप फरक आहे.जर आपण फेंगशुईचा आश्रय घेत असाल तर त्याच्याच दृष्टिकाेनातून आपल्याला अपार्टमेंटचे निरीक्षण करायला हवे.अपार्टमेंट भूखंडावर एकटेच उभे आहे की, त्याच्या भाेवती इतर अपार्टमेंट्सही आहेत. त्यांची उंची समान आहे की आपण पसंत केलेल्या अपार्टमेंटपेक्षा जास्त वा कमी आहे.
आजूबाजूचे खूप उंच अपार्टमेंट्स आपण निवडलेल्या कमी उंचीच्या अपार्टमेंटसाठी अशुभ आणि घातक ठरू शकतात. जर जास्त उंचीच्या अपार्टमेंटचे प्रवेशद्वार आपल्या खुजा व छाेट्या भूखंडाजवळ असेल तर ती स्थिती जास्तच घातक ठरू शकते.प्रवेशमार्गाजवळ माेठे हाेर्डिंग, ट्यूबवेल वा उंच टेकडी इत्यादी नसावे. कारण यामुळे फ्लॅटमध्ये जाणारी लाभदायक ‘ची’(सकारात्मक ऊर्जा) प्रभावित हाेते. यासाठी आपले अपार्टमेंट सर्व बाजूंनी सुरक्षित असायला हवे. तसेच फेंगशुईच्या नियमांमध्ये बसायला हवे.जी अपार्टमेंट एखाद्या टेकडीवर एकटीच उभी असतात त्यांची स्थितीही चांगली नसते. कारण त्यांच्याजवळून वाहणारा वारा अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणारी ‘ची’ आपल्यासाेबत उडवून नेताे. फ्लॅटमध्ये राहणारे लाेक त्या लाभदायक ऊर्जेपासून नेहमीच दूर राहतात. अशा अपार्टमेंट नकारात्मक ‘ची’ची रचना करतात.