देशाला भविष्यात संरक्षणसज्ज ठेवायचे असेल, तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक गरजांवर स्वतःचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्र इंडियाचा अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्प देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण, एअराेस्पेस, विमाननिर्मिती, क्षेपणास्त्र कार्यक्रम, रेल्वे आणि इतर धाेरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या अल्युमिनियम मिश्रधातूंच्या निर्मितीला माेठी चालना मिळेल आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत माेठी भर पडेल,’ असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येथे व्य्नत केला.यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10 हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेस प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राजनाथ सिंह बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार, संयु्नत सचिव गरिमा भगत, यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांच्यासह संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अंतराळ कार्यक्रमांसाठी हलके, मजबूत आणि प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकणारे धातू आवश्यक असतात. अशा धातूंची निर्मिती विशेष प्रक्रियेद्वारे केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. माेठ्या यंत्रणांची खरी ताकद हजाराे लहान-माेठ्या घटकांमध्ये दडलेली असते. अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेसमुळे या क्षेत्रात अधिक वेगाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल हाेईल, असा विश्वासही त्यांनी व्य्नत केला.संरक्षण क्षेत्रात भारताची वाढती ताकद जगभरात मान्य हाेत असून, केंद्राच्या धाेरणांमुळे देश जागतिक संरक्षण उत्पादन निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित हाेईल. विदर्भात विशेषतः नागपूरचा परिसर हा डिफेंस मॅनुफॅक्चरिंग इकाेसिस्टिमममध्ये देशाचे महत्त्वाचे अंग म्हणून विकसित हाेत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.