अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा शुभारंभ; शहा यांच्या उपस्थितीत काेनशिलेचे अनावरण

    24-Jun-2026
Total Views |
 

ambabai 
 
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1445.97 काेटींच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या काेनशिलेचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काेल्हापूरचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, वस्त्राेद्याेग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, काेल्हापूरच्या सहपालक मंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियाेजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापाैर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डाॅ. विजय राठाेड, महापालिका आयु्नत डाॅ.राजेंद्र भारूड, पाेलीस अधीक्षक निलाेत्पल यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.
 
शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन केले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर आणि परिसर विकासकामांच्या काेनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. केंद्र आणि राज्य शासन धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध असून, हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच काेल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला.