आंतरराष्ट्रीय याेग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लाेकभवनात तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह याेगसत्रात भाग घेतला. यावर्षी लाेकभवनातील याेग दिवस तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.तटरक्षक दल यंदा स्थापनेच्या सुवर्णमहाेत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या याेगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय; तसेच लाेकभवनातील अधिकारी उपस्थित हाेते. सन 1977 मध्ये झालेल्या स्थापनेपासून राष्ट्रसेवेत कार्यरत असलेल्या व यंदा सुवर्ण महाेत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या तटरक्षक दलाच्या याेगदानाचे राज्यपाल वर्मा यांनी काैतुक केले. यावेळी तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे अतिर्नित महासंचालक एम. व्ही. पाठक तसेच महानिरीक्षक भीष्म शर्मा यांनी राज्यपालांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कैवल्यधामचे याेग प्रशिक्षक दिलीप दाैनेरिया यांनी याेग व प्राणायाम सत्राचे मार्गदर्शन केले.