पूर्वी जिथे लाेक चांगल्या संधींसाठी त्वरित नाेकरी बदलण्यावर विश्वास ठेवत हाेते, तिथे आता कर्मचारी त्यांची सध्याची नाेकरी घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जाॅबला कवटाळून बसणे म्हणजे आपल्या सध्याच्या नाेकरीबद्दल अधिक निष्ठा दर्शविणे आणि काेणत्याही परिस्थितीत नाेकरी साेडायची नाही हे पक्के असणे. हे जाॅब हाॅपिंगच्या अगदी उलट आहे. यामध्ये नवीन नाेकरी शाेधण्याऐवजी किंवा जाेखीम पत्करण्याऐवजी कर्मचार् याला आपल्या सध्याच्या पदावर सुरक्षित राहायचे असते.ताे आपल्या कंपनीबद्दल अधिक समर्पण दर्शविताे आणि लेऑफच्या भीतीने स्वत: ला एक चांगला आणि मेहनती कर्मचारी म्हणून दर्शविण्याचा प्रयत्न करताे.जाॅब हगिंगचे प्रमाण वाढत आहे. कर्मचारी नवीन नाेकरी शाेधण्याऐवजी आपल्या सध्याच्या नाेकरीला घट्ट चिकटून राहत आहेत. आर्थिक अस्थिरता, नाेकरी जाण्याची भीती आणि विकासाच्या संधींची कमतरता यामुळे जाॅब हगिंग वाढले आहे.
तज्ञांच्या मते, यामुळे सुरक्षित वाटते तसेच कामगार आणि व्यवसाय या दाेघांसाठीही दीर्घकालीन स्थिरता निर्माण हाेते. हा कल का वाढत आहे? नाेकरीला चिटकून बसण्याचा कल वाढण्यामागे अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणे आहेत.आर्थिक आव्हाने- जागतिक बाजारपेठेतील मंदीचा आवाज आणि वाढती महागाई यामुळे लाेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जेव्हा अर्थव्यवस्था अस्थिर असते, तेव्हा लाेक नवीन कंपनीतील अस्थिरतेच्या भीतीने जुनी नाेकरी साेडत नाहीत.तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील माेठ्या प्रमाणात कपातींमुळे कर्मचार् यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आपली नाेकरी टिकवून ठेवणे जगण्यासाठी अतिशय आवश्यक ठरले आहे.हायब्रीड वर्क आणि सुविधा: अनेक कर्मचारी त्यांना वर्क फ्राॅम हाेम किंवा लवचिकता देणार् या कंपन्या साेडू इच्छित नाहीत, कारण नवीन नाेकरीत ही साेय मिळेल की नाही याची काेणतीही हमी नसते.नाेकरीला चिटकून राहण्याचे ताेटे हे सुरक्षित वाटू शकते, परंतु दीर्घकाळापर्यंत ते कर्मचारी आणि कंपनी दाेघांसाठी हानिकारक ठरू शकते.