गाेवा क्रांती दिनानिमित्त पणजी येथे आयाेजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात गाेवामु्नती संग्रामात माेलाची भूमिका बजावलेल्या दैनिक तरुण भारत आणि दैनिक केसरी मराठा या वृत्तपत्रांचा गाैरव करण्यात आला.गाेवामु्नती संग्रामातील उल्लेखनीय याेगदानाबद्दल दै.तरुण भारतचे सल्लागार संपादक तथा लाेकमान्य समूहाचे अध्यक्ष डाॅ. किरण ठाकूर यांना विशेष प्रमाणपत्रसह राज्यस्तरीय सन्मानाने गाैरविण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सन्मान गाेव्याचे राज्यपाल अशाेक गजपती राजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या गाैरवशाली साेहळ्यास गाेव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर, विराेधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डाॅ. व्ही. कांडावळ तसेच स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष दादा देसाई यांची मान्यवर उपस्थिती हाेती.