जीवनातील कटू सत्ये ओळखा!

    22-Jun-2026
Total Views |
 

thoughts 
 
पालक, भावंडे, बेस्ट फ्रेंड्स यांच्यापैकी कुणीही तुमच्यावर निरपेक्षपणे, विनाअट प्रेम करत नाही. तुमची एखादी-दुसरी ओळख तयार झालेली असते आणि त्यावर त्यांचा कमालीचा विश्वास असताे. त्यांच्या या विश्वासाच्या विराेधात तुम्ही काही करून बघाच त्यांची प्रतिक्रिया किती तीव्र असेल.
 
 तुम्ही कितीही विचार केलाततरी समस्या सुटणार नसतात. कृती केल्याने सुटू शकतात.तुम्ही समस्येवर कितीही चिंतन केले तरी त्यातून काही फरक पडणार नसताे.
 
 90 टक्के लाेकांना तुम्हाला कशाची काळजी वाटते किंवा तुमची अडचण काय आहे याच्याशी काहीही देणेघेणे नसते. उरलेल्यांतील पाच टक्के तुम्ही अडचणीत आहात हे कळल्याने मनातून आनंदात असतात. राहिलेले पाच टक्के काळजी व्यक्त करतील, पण त्याचा काहीही उपयाेग नसताे.
 
 मान्य करा अथवा करू नका, पण आपण स्वतःच आपले असताे. अन्य कुणी नव्हे, तर तुम्हीच तुमचे आयुष्य बदलू शकता. कुणालाही आयुष्यात गाेंधळ नकाे असताे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची काळजी घेत नाही तेव्हा सगळे तुमच्या मनाविरुद्ध घडू लागते.
 
 तुम्ही कधीही दुसऱ्याला बदलू शकत नाही.अगदी तुमचे पालक, भावंडे, बेस्ट फ्रेंड्स आणि कुणालाच. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, त्यांच्या आयुष्यातील समस्या आणि त्याच्या परिणामांमुळे ते वैतागलेले असतात. कधीतरी ते समस्यांपुढे मान तुकवणार असतात. तुम्ही मात्र आहे तिथेच असता.
 
 साैंदर्य, प्रेम आणि जगणे याबाबत साेशल मीडिया अव्यवहार्य आणि अमानवी निकष ठरवत आहत्याला भुलून तुम्ही स्वतःचे मनस्वास्थ्य गमावून बसू नका. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका साेशल मीडियामुळे तुमची नाती, जगणे उद्ध्वस्त हाेत आहेत आणि तुमचे मन आणि ऊर्जा नष्ट करण्याचे काम केले जात आहे.
 
 पृथ्वी नावाच्या ग्रहावर तुमचे अस्तित्व अगदी मर्यादित काळापुरतेच आहे. तुम्ही काही अमर नाही. तुमचा आत्मा अमर आहे, पण तुम्हाला पुन्हा माणसाचे आयुष्य मिळेल, याची कुठलीही शाश्वती नसते. त्यामुळे इतरांपेक्षा स्वतःसाठी आयुष्य अधिक सुखकर करा.
शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या गाेष्टी तुम्हाला भडकवण्यासाठी किंवा भीती/द्वेष निर्माण करण्यासाठी दिलेल्या नाहीत, तर तुम्ही स्वतःचे आयुष्य जगायला शिका, एवढीच आठवण करून देण्यासाठी सांगितलेल्या आहेत.