न्यूयाॅर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 राेजी हल्ला झाल्यानंतर एका कंपनीने त्या ट्विन टाॅवर्समधील अन्य कंपन्यांमधील वाचलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र बाेलवले हाेते. या कार्यक्रमात सुरक्षा विभागाच्या प्रमुखांनी हे सगळे कर्मचारी का वाचले, याची माहिती दिली. त्याची कारणे अगदी क्षुल्लक वाटावीत अशी हाेती.ताे म्हणाला, की कंपनीचे प्रमुख वाचले कारण त्या दिवशी त्या दिवसापासून त्यांचा मुलगा किंडरगार्टनच्या वर्गात जायला सुरुवात करणार हाेता. त्याला साेडायला ते गेल्याने ऑिफसमध्ये येऊ शकले नव्हते.
आणखी एक जण वाचला, कारण त्या दिवशी ऑिफसमधील सगळ्यांसाठी डाेनट आणण्याची पाळी त्याची हाेती.एक स्त्री कर्मचारी वाचली, कारण त्या दिवशी तिच्या घड्याळाचा गजरच झाला नाही आणि मग तिला आवरायला उशीर झाला हाेता. त्यांच्यापैकी एकाची त्या दिवशी बस चुकल्याने ताे वाचला.
एकीच्या कपड्यांवर खाद्यपदार्थ सांडल्याने कपडे बदलण्यात तिचा वेळ गेला आणि मग ऑिफसला पाेचायला उशीर झाल्याने ती वाचली.एकाची कार स्टार्ट न झाल्याने ताे ऑिफसला पाेचू शकला नाही.एक जण घरातून निघतानाच त्याला ाेन आला. त्याने ताे ाेन घेतला. पण त्यामुळे त्याला ऑिफसमध्ये पाेचायला उशीर झाला.घरातून निघतानाच एकाच्या मुलाने हट्ट सुरू केला आणि काही केल्या ताे ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला पाेचायला उशीर झाला. एकाला वेळेत टॅक्सी न मिळाल्याने उशीर झाला हाेता.सगळ्यात माझ्या मनाला भिडलेले कारण म्हणजे एकाने आदल्या दिवशी नवे शूज घेतले हाेते. ते घालून सकाळी ताे घरातून निघाला. पण ते शूज चावत असल्याने त्याच्या पायाला ाेड आले. त्यामुळे वाटेत मेडिकलच्या दुकानात ताे बँड-एड घेण्यासाठी थांबला.
त्यामुळेच आज ताे जिवंत हाेता.
म्हणूनच आता मी जेव्हा ट्रॅिफकमध्ये अडकताे, मी पाेचत असतानाच लिफ्टचा दरवाजा बंद हाेताे, वाजणारा ाेन रिसीव्ह करण्यासाठी परत यावे लागते....अशा सगळ्या गाेष्टींचा मला त्रास हाेताे.पण, मी असा विचार करताे की, त्या वेळी मी कुठे असावे हे देवानेच ठरवले असल्याने मी त्रास करून घेत नाही.पुढच्या वेळी तुमची सकाळची सुरुवात खराब हाेईल.मुले हळूहळू आवरत असतील.तुम्हाला कारची किल्ली सापडत नसेल.तुम्ही वाहतुकीच्या काेंडीत अडकला असाल...तर निराश हाेऊ नका, चिडचिडेपणा करू नका.ऱ्हाेंडा बार्न म्हणते, प्रत्येक गाेष्टी चांगले शाेधा.विशेषतः जेव्हा तुमच्यासमाेर अडचणीची किंवा नकारात्मक परिस्थिती असते तेव्हा.जे काही घडत असते ते आपल्या भल्यासाठी घडत असते. त्यातून शेवटी आपले चांगलेच हाेणार असते.नेहमी कृतज्ञ भावनेने जगा.