पॅसिव्ह स्माेकिंग देखील धाेकादायक ठरू शकते

    20-Jun-2026
Total Views |
 
 

smoking 
पॅसिव्ह स्माेकिंगचा परिणाम किती काळानंतर दिसून येताे? याचा काेणताही निश्चित निकष नाही की आपण काही काळापर्यंत त्यापासून सुरक्षित आहाेत. सेकंड हँड धुरामुळे हाेणारे नुकसान अवघ्या पाच मिनिटांत सुरू हाेते आणि जळजळ; तसेच श्वसनाची प्रतिक्रिया जवळजवळ त्वरित हाेते.पाच मिनिटांनंतर धमन्या कमी लवचिक बनतात जसे सिगारेट पिणाऱ्या व्य्नतीमध्ये घडते. 20-30 मिनिटांनंतर र्नत गाेठू लागते आणि र्नतवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयविकार, स्ट्राेकचा धाेका वाढताे. दाेन तासांनंतर अनियंत्रित हृदयाचे ठाेके विकसित हाेऊ शकतात. सेकंड हँड धूर खाेलीत सुमारे पाच तास राहू शकताे.खरं तर ताे व्हेंटिलेशनमधूनही जाऊ शकताे.
 
सेकंड हँड स्माेकपासून वाचण्याचा उपाय त्याच्या संपर्कापासून वाचण्याचा सर्वाे त्तम मार्ग म्हणजे जिथे लाेक धूम्रपान करतात त्या ठिकाणांपासून दूर राहावे.आता ऑफिस आणि एअरपाेर्टसारख्या ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था केली जाते; जेणेकरून इतर लाेक त्याच्या परिणामांपासून वाचू शकतील. आता सार्वजनिक ठिकाणी नाे-स्माेकिंगचे बाेर्ड लावलेले असतात.
खुल्या खिडक्या आणि एअर फिल्टर्स सर्व सेकंड हँड धूर दूर करत नाहीत. परंतते काही विषारी घटक कमी करून थाेडी मदत करू शकतात. या सर्वांमध्ये आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठीही धूम्रपान न करणे सर्वात उत्तम आहे. तसेच पॅसिव्ह स्माेकिंगपासून दूर राहणे शक्य नसेल तरीही जिथे शक्य असेल तिथे प्रयत्नपूर्वक त्यापासून दूर राहून आपण आपल्या आराेग्याची काळजी घेतली पाहिजे.