नाेकरीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी नाे नाेटीस पिरियड

    02-Jun-2026
Total Views |
 

zero 
 
एकदा नाेकरीत चिकटला की निवृत्तीपर्यंत नाेकरी, पदाेन्नती, पगारवाढ, निवृत्त झाल्यावर मरेपर्यंत किंवा मृत्यूनंतर वैवाहिक जाेडीदार जिवंत असेपर्यंत पेन्शन, हे सगळे लाड आता काही सरकारी नाेकऱ्या साेडल्यास कुठे राहिलेले नाहीत फार. कंत्राटी नाेकऱ्या खासगी क्षेत्रात चाैफेर बाेकाळल्या आहेत 30-35 वर्षांपासून. या नाेकऱ्यांमध्ये ना भविष्यनिर्वाह निधी, ना ग्रॅच्युइटी, ना नाेकरी कायम राहण्याची हमी. कंत्राटाच्या काळापुरती नाेकरी आणि सगळे कर कापून हातात येईल ताे तुमचा पगार. त्यातून तुमच्या भवितव्याची तरतूद तुम्हीच करायची.
 
शिवाय कंपनीला तुमचं काम पसंत पडलं नाही, कंपनीत काही वाद झाला, कंपनीला तुमची गरज राहिली नाही की काही महिन्यांच्या नाेटीस पिरियडनंतर गच्छंती अटळ. तुम्हाला दुसरीकडे अधिक आकर्षक नाेकरी मिळाली तर तुम्हीही नाेटीस पिरियड सर्व्ह करून जायचं. आता त्यापुढचा काळ आलेला आहे. झाेमॅटाेने नाे नाेटीस पिरियड धाेरण स्वीकारलं आहे, तेच बऱ्याच कंपन्या स्वीकारतील. ज्याला जायचंच आहे, ताे नाेकरीत बळजबरीने राहिला तर अनिच्छेने काम करताे, इतरांचं मन कलुषित करताे. त्यापेक्षा त्याला लगेच माेकळं करा, असं कारण सांगतात काॅर्पाेरेट. पण त्याचा दुसरा खतरनाक अर्थ असा आहे की कंपनीही तुम्हाला एका दिवसात, एका क्षणात नाेकरीवरून काढू शकते.तिलाही नाेटीस पिरियड देण्याचं बंधन नाही.