सुखाेई-30ची देखभाल आता आयआयटी मुंबईकडे

    02-Jun-2026
Total Views |
 
 

sukhoi 
हवाई दलाच्या सुखाेई-30 एमकेआयफ विमानांमध्ये संभाव्य तांत्रिक बिघाड हाेण्यापूर्वीच त्याचा अंदाज घेऊन आवश्यक उपाययाेजना करण्यास आणि तांत्रिक देखभालीसाठी प्रगत डेटाआधारित तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय आयआयटी मुंबईने घेतला आहे.त्यामुळे हवाई दलाची कार्यक्षमता आणि सज्जता अधिक मजबूत हाेण्यास मदत हाेणार आहे; तसेच हे संपूर्ण तंत्रज्ञान आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या स्वदेशी ज्ञान आणि संशाेधनावर आधारित असणार आहे.सध्या लढाऊ विमानांची देखभाल ठराविक वेळापत्रकानुसार केली जाते. काही वेळा विमानात प्रत्यक्ष बिघाड झाल्यानंतरच दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करावी लागते. मात्र, नव्या डेटा ड्रिव्हन इंजिनिअरिंग प्रणालीमुळे विमानातील सेन्सर्स आणि डिजिटल माहितीच्या आधारे यंत्रणांची स्थिती सतत तपासता येणार आहे. त्यामुळे काेणता भाग कधी बदलण्याची आवश्यकता आहे, काेणत्या प्रणालीवर अतिर्नित लक्ष द्यावे लागेल किंवा काेणती समस्या भविष्यात उद्भवू शकते, याचा अंदाज आधीच घेणे शक्य हाेणार आहे.हवाई दल आणि आयआयटी मुंबई संयु्नतरित्या प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स आणि प्राेग्नाॅस्टिक अँड प्रेस्क्रिप्टिव्ह मेंटेनन्स ही आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणार आहे.
 
या प्रणालीच्या माध्यमातून विमानांच्या विविध यंत्रणांमधून मिळणाऱ्या तांत्रिक माहितीचे सातत्याने विश्लेषण करण्यातयेईल. या तंत्रज्ञानामुळे इंजिन, हायड्राॅलिक प्रणाली, इलेक्ट्राॅनिक उपकरणे किंवा इतर महत्त्वाच्या भागांमध्ये भविष्यात बिघाड हाेण्याच्या शक्यतेचा आधीच अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे अनपेक्षित तांत्रिक अडचणी कमी हाेऊन विमानांची उपलब्धता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत हाेणार आहे. या तंत्रज्ञानामुळे देखभाल प्रक्रियेतील वेळ, खर्च आणि मनुष्यबळाचा ताण कमी हाेण्याची अपेक्षा व्य्नत केली जात आहे. त्याचबराेबर लढाऊ विमानांची उड्डाणासाठीची उपलब्धता वाढल्याने हवाई दलाच्या ऑपरेशनल रेडिनेसमध्येही सुधारणा हाेणार आहे. संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि प्रगत अभियांत्रिकीचा वापर वाढविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. एअर मार्शल व महासंचालक (एअरक्राफ्ट) के. ए. ए. संजीब आणि आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्या उपस्थितीत या संदर्भातील सहकार्याबाबत नुकताच औपचारिक प्रारंभ करण्यात आला.