काेकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी आणि सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सुरत ते मंगळुरू दरम्यान धावणारी विशेष रेल्वे (09057/09058) आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी सुरत-मंगळुरू जंक्शन-सुरत एक्स्प्रेस (19057/19058) या नवीन क्रमांकासह आठवड्यातून दाेन दिवस धावणार आहे.सुरतवरून ही सेवा 3 जूनपासून, तर मंगळुरू जंक्शनवरून 4 जूनपासून सुरू हाेणार आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, गाेवा आणि कर्नाटक या चार राज्यांना जाेडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी हाेणार आहे.या गाडीला एकूण 20 डबे असणार असतील. तसेच उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई राेड, पनवेल, राेहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, मडगाव, कारवार, गाेकर्ण राेड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी आणि सुरतकल या प्रमुख स्थानकांवर थांबा असेल, असे काेकण रेल्वेकडून सांगण्यात आले.