काेणताही पैलू, काेणतीही गाेष्ट असम राहू नये. कृष्ण त्याच सम्यकचा अंगुलीनिर्देश करीत आहे. ताे म्हणताे, तुमच्या कर्मात तुम्ही नेहमीच संयत रहा. जेवढी गरज आहे तितकाच प्रयत्न करा. जास्तही नकाे न् कमीही नकाे.मग कर्मे तुम्हाला बांधू शकत नाहीत असे आढळून येईल.जाे काेणी सम्यक प्रयत्न करताे ताे कर्माबाहेर जाताे. जाे जास्त प्रयत्न करताे ताे पस्तावताे कारण त्याला शेवटी फळ कमी मिळते. जाे कमी प्रयत्न करताे ताेही पस्तावताे. कारण त्याला फळ मिळतच नाही. पण जाे काेणी सम्यक प्रयत्न करताे ताे कधीच पस्तावत नसताे. मग फळ मिळाे वा ना मिळाे. जाे सम्यक यत्न करत असताे ताे चुकूनसुद्धा पस्तावत नसताे, कारण त्याला माहीत असते की जे करायला पाहिजे हाेते ते त्याने केलेले असते. ज्याची गरज हाेती ते मिळालेले असते. जे मिळायची गरज नव्हती ते मिळालेले नाही. जे मिळायचे हाेते ते मिळालेले आहे. माझ्याकडून जे व्हायला पाहिजे हाेते ते मी करून टाकले आहे. गाेष्ट संपली.
नुकतेच माझ्याकडे एक मित्र आले हाेते, त्यांची पत्नी नुकतीच वारली हाेती. अतिशय शाेक करीत हाेते. दु:खाने संत्रस्त झाले हाेते. मी त्यांना म्हटले, ‘पत्नीबराेबर तुम्हाला इतके खुश झालेले पाहिलं नव्हतं की तुम्हाला तिच्या मृत्यूने इतके दु:ख हाेत असेल असे मला वाटतच नाही’. मी म्हटले, ‘असम्यक प्रयत्न आहे हा. त्यावेळी जास्त खुश झाला असतात तर आता कमी रडावे लागले असते.’ ते थाेडे वैतागले त्यांनी म्हटलं, ‘म्हणजे काय?’ मी म्हटले, ‘थाेडे बॅलन्सिंग झाले असते. खरे सांगा बघू, पत्नीच्या मरण्याने रडताहात की ग्यानबाची मेख दुसरीच आहे. कारण कित्येकदा गाेष्टी वेगळ्याच असतात. अन् ढाेंगे वेगळीच असतात. माणसाच्या बेईमानीलाही काही सीमा पाहिजे.’ त्यांनी म्हटले, ‘काय म्हणता तरी काय? माझी पत्नी गेली आहे अन् तुम्ही म्हणताहात ढाेंग अन् बेईमानी. माझी पत्नी गेली आहे, मी दु:खात आहे. हे ढाेंग आहे?’ मी म्हटले, ‘तुम्ही दु:खात आहात हे मान्य तरी पण आणखी एकदा विचारताे.