काेल्हापूर आयटी पार्कसाठीची जागा एमआयडीसीकड

    02-Jun-2026
Total Views |
 

IT 
काेल्हापूरच्या तांत्रिक आणि औद्याेगिक विकासाला माेठी गती देणाऱ्या प्रस्तावित आयटी पार्क (माहिती-तंत्रज्ञान पार्क) उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा नुकताच पार पडला. शहरातील शेंडा पार्क येथील 34.36 हेक्टर शासकीय जमिनीचा ताबा महसूल विभागाने महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला आहे.जमिनीची प्रत्यक्ष माेजणी आणि सीमांकन पूर्ण करून हा ताबा देण्यात आल्याने आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग माेकळा झाला आहे.या आयटी पार्कच्या विकासासाठी शेंडा पार्क येथील 34.36 हेक्टर जमीन एमआयडीसीला देण्यास महसूल व वन विभागाने मान्यता दिली हाेती.
 
या जमिनीची प्रचलित बाजारमूल्यानुसार केलेली 5 काेटी 60 लाख 23 हजार 980 रुपयांची र्नकम एमआयडीसीने 30 मार्चला शासकीय काेषागारात जमा केली हाेती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 एप्रिलला जमीन हस्तांतराचे आदेश दिले हाेते.या क्षेत्राची प्रत्यक्ष माेजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने काेल्हापूरचे अतिर्नित जिल्हाधिकारी संजय शिंदे व करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. ही जमीन आता एमआयडीसीच्या ताब्यात आल्यामुळे काेल्हापुरात अत्याधुनिक आयटी पार्क उभारणीच्या कामाला वेग येणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर राेजगाराच्या माेठ्या संधी उपलब्ध हाेणार आहेत