आपल्या पायावर सूज का येते?

    02-Jun-2026
Total Views |
 
 

Health 
 
सूज एका पायावर आहे किंवा दाेन्ही पायांवर यावरही राेगाचे निदान अवलंबून असते. र्नत प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हत्तीराेगामुळे, वावड्यामुळे जंतु दाेशामळे प्राणिदंशामुळे सांधे हाडे यांच्या राेगांमुळे किंवा बुरशीच्या संसर्गामुळे एका पायावर सूज येवू शकते. गंभीर राेग, हत्तीराेगाची गंभीर अवस्था, मूत्रपिंडाचे राेग, हृदयविकार कुपाेषण र्नतपांढरी (अ‍ॅनेमिया) गाेडेतेलातील भेसळ इत्यादीमुळे दाेन्ही पायांवर सूज येते.वरील राेगांकडे पाहिल्यास लक्षात येते की, काही राेग सहज प्रतिबंध करणाऱ्या जाेगे आहेत. समताेल आहार घेतल्याने कुपाेषण र्नतपांढरी हे राेग टाळता येतील डासांचा नायनाट केल्यास किंवा डास आल्याला चावू नयेत याची काळजी घेतल्यास हत्तीराेगापासून बचाव करता येईल. वावडयातील एव्हील, कार्टिकास्टेराॅईड सारखी औषधे दाहामुळे येणाऱ्या सूजेसाठी अ‍ॅ्रस्परीन ब्रूफेन साारखी औषधे वापरता येतील. परंतु हृदयराेग मूत्रपिंडराेग असे गंभीर कारण असल्यास मात्र तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील. विविध तपासण्यांच्या सहाय्याने डाॅ्नटर या राेगांचे नेमके निदान करू शकतात. व राेग नियंत्रणात आल्यावर पायावर सूज येण्यासारखी लक्षणे आपाेआप कमी हाेतील.