पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चाैंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे आदी उपस्थित हाेते. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी हाेळकर स्मारकात जाऊन दर्शन घेतले.