अमेरिकेत एआय शिक्षक विद्यार्थ्यांना साक्षरता शिकवू लागल

    19-Jun-2026
Total Views |
 
newark-high-school-starts-ai
 
संध्यानंद.काॅम
 
आजकाल, न्यूयाॅर्कमधील नेवार्क येथील ‘वाॅशिंग्टन पार्क हायस्कूल’ मधील एक वर्ग एका विचित्र शांततेने आणि त्यानंतर हाेणाऱ्या गरमागरम चर्चेने भरलेला असताे. येथील विषय गणित किंवा इतिहास नसून, भविष्याला आकार देणारी एक गाेष्ट आहे... एआय साक्षरता.
 
विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञान शिकण्यासाठी उपक्रम शिक्षक माईक टाॅबमन आणि स्काॅट केर्न यांनी नुकताच 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाेखा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यांच्या मते एआय हे एका गाडीसारखे आहे. त्यांना वाटते, की त्यांच्या विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाच्या मागच्या सीटवर केवळ प्रवासी न बनता, त्याला याेग्य दिशेने नेणारे कुशल चालक बनावे. टाॅबमन या वर्गाची तुलना ड्रायव्हिंग परीक्षेच्या तयारीशी करतात.
 
तुम्ही तंत्रज्ञान चालवताय, की तंत्रज्ञान तुम्हाला चालवतेय? वर्गातील व्हाईटबाेर्डवर एक प्रश्न लिहिलेला आहे. ‘तुम्ही तंत्रज्ञान चालवत आहात, की तंत्रज्ञान तुम्हाला चालवत आहे?’ 18 वर्षीय विद्यार्थी एड्रियन फॅरेल याने सांगितले, की ताे त्याच्या गणिताच्या गृहपाठाची अचूकता तपासण्यासाठी एआयचा वापर करताे. तर, ब्रियाना पेरेझ कबूल करते की, जेव्हा ती स्पाॅटिफाईचा ‘एआय डीजे’ ऐकते, तेव्हा ती गाडीतील पॅसेंजर सारखी म्हणजे पॅसेंजर माेडमध्ये असते. कारण, तंत्रज्ञान तिच्या निवडी ठरवत असते.
 
विद्यार्थ्यांंना आव्हान देणारे चॅटबाॅट शाळेतील शिक्षकांनी या नवीन अभ्यासक्रमासाठी काही मनाेरंजक दृष्टिकाेन स्वीकारले आहेत. इतिहासाच्या वर्गासाठी एक विशेष चॅटबाॅट तयार करण्यात आला आहे जाे विद्यार्थ्यांच्या युक्तिवादांना आव्हान देताे. जेव्हा 17 वर्षीय लिसन दंगलींच्या कारणांबद्दल वाद घालत हाेती, तेव्हा चॅटबाॅटने तिला सांगितले, ‘तू यावर अजून थाेडा विचार करावा, अशी माझी इच्छा आहे.’ लिसन म्हणते की, या चर्चेमुळे तिला अधिक चांगला विचार करण्यास मदत झाली आहे.

एआयच्या मदतीने विद्यार्थी करतात प्रकल्प दुसऱ्या एका वर्गात, विद्यार्थी करिअर सिम्युलेशनसाठी एआयचा वापर करत आहेत. नर्स बनू इच्छिणाऱ्या 17 वर्षीय अनियाने एआयच्या मदतीने आपला प्रकल्प अधिक स्पष्ट केला आहे. ब्रियाना म्हणते, जर असे अभ्यासक्रम नसते, तर भविष्य काय घेऊन येणार आहे, हे आपल्याला कळले नसते. आता शाळा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एआय ड्रायव्हिंग लायसन्स अभ्यासक्रम अनिवार्य करण्याची याेजना आखत आहे.

डीपफेक, बाैद्धिक संपदा आदीबद्दलही गंभीर चर्चा केर्न म्हणतात, जेव्हा मुले एकमेकांशी बाेलत असतात किंवा स्वतःच्या विचारांचा वापर करत असतात, तेव्हा एआयने त्यात हस्तक्षेप करू नये, असे मला वाटते. या अभ्यासक्रमात डीपफेक, काॅपीराइट आणि बाैद्धिक संपदा यांसारख्या गंभीर विषयांवरही चर्चा केली जाते.