आपण हनीमूनविषयी ऐकले असेलच, पण आता ‘बडीमून’ ट्रेंड करीत आहे. हा आपल्याला नवी नाती नव्या पद्धतीने जाणण्यास मदत करील. नुकतेच साेनमचे लग्न झाले हाेते, पण लग्नानंतर तिला नव्या घरात एकटे वाटत हाेते. पती ऑफिसात निघून जातात आणि दिवस माेठा आणि मूक हाेताे. ती कुटुंबीयांसाेबत बसते पण आपुलकी जाणवू शकत नाही आणि मुकाट्याने आपल्या रूममध्ये परतते. एक दिवस तिने पतीशी आपली अडचण शेअर केली. तेव्हा पतीने एक आगळा सल्ला दिला जाे हनीमून नव्हे तर बडीमूनचा हाेता.जवळ येण्याची पद्धत बडीमन दाेन शब्द ‘बडी’ म्हणजेच मित्र/कुटुंबीय आणि ‘मून’ म्हणजे हनीमूनपासून मिळून बनला आहे. यात नवविवाहित जाेडपे एकटे नव्हे तर मित्र व कुटुंबीयांसाेबत ट्रिपवर जातात.
हा ट्रेंड विशेषकरून त्या कपल्समध्ये लाेकप्रिय हाेत आहे जे लग्नानंतर कुटुुंबासाेबत मजबूत संबंध बनवू इच्छित असतात.परदेशांनंतर आता भारतातही याचा ट्रेंड वाढत आहे. हा नवे सुख थाेडे जास्त जगण्यास व नवी नाती जाणण्यास मदत करीत आहे.कुटुंबाच्या समीप बडीमून फक्त एक प्रवास नसून नाती मजबूत करण्याची सुवर्णसंधी आहे. लग्नानंतर जेव्हा संपूर्ण कुटुंबासाेबत वेळ घालवायचा असताे तेव्हा आपसातील औपचारिकता कमी हाेऊन आपुलकी वाढते. या अनाैपचारिक वातावरणात लाेक एकमेकांना उत्तम प्रकारे समजतात व बिचका व दुरावा हळू हळू दूर हाेताे. साेबत फिरणे, खाणे, हसणे नात्यांना नैसर्गिक रुपाने मजबूत बनवते, विशेषकरून नवविवाहित जाेड्यांसाठी हा काळ अत्यंत खास असताे. ज्यामुळे ते कुटुंबाचा भाग जाणवतात.
जाणण्याची संधी ही ट्रिप फक्त फिरण्यासाठी नसते तर यात कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या छाेट्या छाेट्या सवयी समजू शकतात आणि आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकता. घरी परतून नाती पूर्वीपेक्षा जास्त गहिरी हाेतात. अशात बडीमूनच्या काळात कपल आपल्या कुटुुंब वा मित्रांसाेबत एका हल्नया व आनंदी वातावरणात वेळ घालवू शकतात. ज्यामध्ये तणावाची पातळीही कमी हाेऊ शकते. तणाव हटताे लग्नात बहुधा संपूर्ण कुटुंबाला माेठ्या तणावाचा सामना करावा लागताे. एका सर्वेनुसार 71 टक्के लाेकांनी सांगितले की लग्नातील तयारी नवी नाेकरी शाेधण्यापेक्षाही जास्त तणावाचे असते.
अशा वेळी बडीमून सारखे छाेटे प्रवास कुटुंबासाठी दिलासा व आनंदाची संधी बनू शकते. ही ट्रिप सर्वांना तणावापासून दूर करून एकत्र आनंद घेण्याची, नाती मजबूत बनवण्याची आणि संस्मरणीय क्षण घालवण्याची संधी देते.कसा करावा प्लॅन बडीमूनची याेजना बनवण्यासाठी सर्वप्रथम बजेट ठरवा व याेग्य वेळ निवडा. सर्वांच्या आवडीचे डेस्टिनेशन ठरवा. उदा. पर्वत, बीच वा परदेश. प्रवास व हाॅटेलचे आधीपासूनच बुकिंग करा जेणेकरून खर्च कमी हाेईल. माेसम व स्थानिक संस्कृतीची माहिती घ्या.आवश्यक कागदपत्रे व ट्रॅव्हल इंशुरन्स तयार ठेवा. एक हलका प्रवास कार्यक्रम बनवा. खूप कठीण ठेवू नका जेणेकरून आपण आरामात वेळ घालवू शकाल. साेबत माैजमस्तीसाठी कार्यक्रम सामील करा जेणेकरून आपला अनुभव संस्मरणीय हाेऊ शकेल.