चीनच्या टेक कंपनीने खास टे्निनक विकसित केले संध्यानंद.काॅम आयटीसी हाॅटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल चड्ढा यांनी सांगितले, की त्यांच्या हाॅटेल साखळीला लग्नांसाठी माेठी मागणी दिसून येत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात स्पष्टपणे वाढ झाली आहे.
त्यांनी सांगितले, की विशेषतः गाेवा, आग्रा, जयपूर आणि उदयपूर यांसारख्या ठिकाणांवरील या साखळीच्या प्रमुख लक्झरी वेडिंग हाॅटेल्ससाठी माेठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध आणि देशांतर्गत स्तरावर विवाह साेहळे आयाेजित करण्याकडे वाढलेला कल यांमुळे या वाढीला चालना मिळत आहे, असे चड्ढा यांनी नमूद केले.
तसेच, आपल्या विविध ब्रँड्सअंतर्गत विवाह साेहळ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण स्थळे आणि अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी ही साखळी आघाडीचे वेडिंग प्लॅनर्स आणि संबंधित कुटुंबांशी सक्रियपणे संपर्क साधत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गाेव्यात पावसाळ्यातही विवाह गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा इंडियन हाॅटेल्स कंपनीच्या गाेव्यातील मालमत्तांवर (हाॅटेल्समध्ये) हाेणाऱ्या विवाह साेहळ्यांच्या बुकिंगमध्ये 25 ट्न्नयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कंपनीचे गाेवा येथील ऑपरेशन्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित फिलिपाेस यांनी दिली. मध्यपूर्वेतील बाजारपेठांमध्ये भारतीय डेस्टिनेशन वेडिंग्जचे (विशिष्ट ठिकाणी जाऊन केले जाणारे विवाह) प्रमाण माेठे हाेते. परंतु परदेश प्रवासाबाबत सुरक्षिततेच्या काही चिंता हाेत्या. आता लाेक गाेव्यात पावसाळ्यातही विवाह करत आहेत. ही बाब पूर्वी दिसून येत नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
रॅडिसन हाॅटेल ग्रुपच्या विविध हाॅटेल्समधील लग्नांशी संबंधित चाैकशींमध्ये दुहेरी अंकी वाढ झाली असून, यात प्रामुख्याने पर्यटन आणि रिसाॅर्ट स्थळांवरील डेस्टिनेशन वेडिंग्सची मागणी सर्वाधिक असल्याचे रॅडिसन हाॅटेल ग्रुपचे दक्षिण आशियातील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा यांनी सांगितले. गाेवा, नाशिक, चंडीगड, इंदूर आणि गुवाहाटी येथील या साखळीतील हाॅटेल्सची कामगिरी विशेषतः चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नूर महल, दिल्ली-एनसीआर कर्नाल (ऑटाेग्राफ कलेक्शन) हे मॅरियट इंटरनॅशनलचे भारतातील पहिले ऑटाेग्राफ कलेक्शन हाॅटेल आहे.
या हाॅटेलचे महाव्यवस्थापक महेश सिंग जसराेटिया यांनी सांगितले, की येथील विवाह साेहळ्यांच्या व्यवसायात गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ट्न्नयांहून अधिक वाढ दिसून येत आहे. जसराेटिया यांच्या मते, गेल्या काही महिन्यांत सुरुवातीला परदेशात नियाेजित केलेले विवाह साेहळे आता भारतात आयाेजित केले जात आहेत. ऑगस्टपासूनच्या तारखांसाठीही बुकिंग निश्चित हाेत आहेत.
लेझर हाॅटेल्स ग्रुपचे विक्री संचालक शहजाद अस्लम यांनी सांगितले, की गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या हाॅटेल साखळीकडे येणाऱ्या विवाह-विषयक चाैकशीमध्ये 20 ट्न्नयांची वाढ झाली आहे.
त्यासाेबतच संभाव्य ग्राहकांशी हाेणाऱ्या चर्चेचे प्रमाणही वाढले आहे.
हाॅटेलांनी लग्नसमारंभांच्या निमित्ताने नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार केला आहे. फेअरमाँट, जयपूरने ग्रीन किचन ही शाकाहारी पाककला संकल्पना सुरू केली आहे, त्यामध्ये प्रादेशिक शाकाहारी पाककृती आणि विस्मृतीत गेलेल्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे.
खऱ्याखुऱ्या शाही अनुभवाच्या आणि वैयक्तिक सेवेच्या शाेधात असलेल्या कुटुंबांकडून आम्हाला माेठी मागणी दिसत आहे, असे फेअरमाँट जयपूर आणि रॅफल्स जयपूरचे क्लस्टर जनरल मॅनेजर रजत सेठी म्हणाले.
भारतातील प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना पसंती सराेवर हाॅटेल्सने आपल्या निवडक हाॅटेल्समध्ये लग्नासाठी विशेष सुविधा (वेडिंग स्टुडिओ) उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच, चितवन, पीलीभीत, सिंधुदुर्ग आणि मथुरा यांसारख्या उदयाेन्मुख ठिकाणांबाबत लाेकांची वाढती आवड दिसून येत आहे. सराेवर हाॅटेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026 च्या पहिल्या पाच महिन्यांत या हाॅटेल साखळीच्या एकूण फूड अँड बेव्हरेज (खाद्यपदार्थ व पेये) महसुलात विवाह साेहळे आणि त्याशी संबंधित कार्यक्रमांचा वाटा जवळपास 16% इतका हाेता.
रॅफल्स उदयपूरचे विक्री आणि विपणन संचालक मनीष यादव यांनी सांगितले, की बुकिंगमधील कल थेट एखाद्या विशिष्ट घडामाेडीशी जाेडणे कठीण असले, तरी उत्कृष्ट आदरातिथ्य आणि खास (कस्टमाइज्ड) अनुभव देणाऱ्या भारतातील प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना स्पष्ट पसंती दिली जात आहे.
संध्यानंद.काॅम आता तुम्हाला फिल्म पाहण्यासाठी एखाद्या थिएटरमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या कारचे हेडलाइटच तुमच्यासाठी प्राेजे्नटरचे काम करतील.
चिनी टेक दिग्गज कंपनीने एक अशी हेडलाइट सादर केली आहे जी कारच्या समाेरील काेणत्याही भिंतीला सिनेमा स्क्रीनमध्ये बदलू शकते.
बीजिंग ऑटाे शाेमध्ये सादर केलेल्या या ‘ए्नसप्निसेल’ लाइटिंग टे्निनकने ऑटाेमाेबाइल जगताला आश्चर्यचकित केले आहे. या हेडलाइटमध्ये 10 लाख (एक मिलियन) प्निसेल आहेत, ज्या केवळ प्रकाश पसरवित नाहीत, तर पूर्णपणे रंगीत आणि हाय-डेफिनेशन फिल्म प्राेजे्नट करण्यास सक्षम आहेत. गाडी पार्क केल्यानंतर ड्रायव्हर कारच्या आत चालू असलेल्या एंटरटेन्मेंट सिस्टिम किंवा लाइव्ह स्पाेर्टला हेडलाइटच्या द्वारे बाहेरील काेणत्याही सपाट भागावर दाखवू शकताे. सर्वांत विशेष गाेष्ट अशी आहे की, ही टे्निनक सर्व माैसमासाठी अनुकूल आहे.
धुके असाे किंवा पाऊस, हेडलाइट स्वत:ला अॅडजेस्ट करतात, ज्यामुळे प्निचर ्नवालिटी खराब हाेणार नाही. आता कारच्यामध्ये सामना केवळ ‘हाॅर्सपाॅवर’चा राहिला नाही, तर ही कल्पनेची लढाई आहे.
रस्त्यावर संभाषण करील कार हे टेकनिक केवळ मनाेरंजनापर्यंत मर्यादित नाहीये, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही एक पाऊल पुढे आहे. हे स्मार्ट हेडलाइट ‘लाइट लँग्वेज’चा वापर करतात. उदाहरणार्थ, गाडी चालविताना ते रस्त्यावर शब्द लिहून (जसे आधी तुम्ही जा.) दुसऱ्या ड्रायव्हरना किंवा पायी चालणाऱ्यांना सूचना देऊ शकतात. त्याशिवाय नॅव्हिगेशनच्या दरम्यान हे हेडलाइट रस्त्यावरच ‘बाणांची आकृती’ तयार करतात, ज्यामुळे ड्रायव्हरला समजावे की, केव्हा आणि कुठे वळायचे आहे?